Homeताज्या बातम्या

श्रीरामपुरात पोलीस पथकावर जमावाचा हल्ला

श्रीरामपूर : श्रीरामपुरातील वार्ड नं.1 इराणी गल्ली परिसरात शासकीय कर्तव्यावर असलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्याची, जमावाला भडकावून आरोपी सोडवण्याच

खडकवासला धरणात तरूणाची आत्महत्या
मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली गृहविभागाची पाठराखण |
एसएसजीएम कॉलेजमध्ये सब-ज्युनिअर मैदानी स्पर्धांना सुरवात

श्रीरामपूर : श्रीरामपुरातील वार्ड नं.1 इराणी गल्ली परिसरात शासकीय कर्तव्यावर असलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्याची, जमावाला भडकावून आरोपी सोडवण्याची आणि कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याची धक्कादायक घटना घडली. तपासासाठी आलेल्या तळेगाव दाभाडे (जि.पुणे) येथील पोलिसांच्या पथकातून आरोपी जबरीने सोडवण्याचा प्रयत्न झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून स्वसंरक्षणासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. या प्रकाराने परिसरात तणाव निर्माण झाला होता.

 पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यामधील पोलिसांना पाहिजे असलेला आरोपी आयद बाबुलाल सय्यद (रा. इराणी गल्ली, वार्ड नं.1, श्रीरामपूर) याचा शोध घेण्यासाठी तळेगाव दाभाडे गुन्हे तपास पथक श्रीरामपुरात आले होते. खासगी वाहनाने हे पथक इराणी गल्ली परिसरात गेले.

 आरोपीच्या घराचा दरवाजा उघडा असल्याने महिला स्टाफसह पथक आत शिरले असता कुटुंबियांनी झडतीस विरोध केला. पोलीस आल्याचे समजताच आरोपी पाठीमागील दरवाजातून पळाला. पोलिसांनी पाठलाग केला असता किरण मदने यांनी कंपाउंडवरून उडी घेत त्याला पकडले. मात्र, आरोपीने प्रतिकार करत पोलिसांशी झटापट सुरू केली. त्याचवेळी गल्लीतील 30 ते 40 जणांचा जमाव घटनास्थळी जमा झाला. 

 परिस्थिती अधिकच हिंसक होत असताना आरोपीने झेरु नावाच्या तरुणास थेट हल्ल्यासाठी प्रवृत्त केले. त्यानंतर 18-19  वर्ष वयोगटातील तरुणांनी हातात लोखंडी कोयता घेऊन शिवीगाळ करत पथकाच्या दिशेने धावला आणि किरण मदने यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मदने यांनी बचावासाठी हात पुढे केल्याने वार त्यांच्या उजव्या मनगटावर बसला, आणि ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या हातातून रक्तस्त्राव सुरू झाला.

  पोलीस पथकाच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने उपनिरीक्षक मोहारे यांनी स्वसंरक्षणार्थ हवेत एक गोळी फायर केली. गोळीबारानंतर जमाव गल्लीबोळातून पळून गेला. स्थानिक पोलीस मदतीसाठी दाखल होताच आरोपीला पुन्हा बळाचा वापर करून ताब्यात घेण्यात आले. 

COMMENTS