Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जि.प. बीड आदर्श शिक्षक पुरस्काराने श्री. राहुल डोंगर सर सन्मानित

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते गौरवकडा । प्रतिनिधीजिल्हा परिषद बीड आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2025 ने श्री. राहुल नामदेव डोंगर (सहशिक्

सुप्रियाविरूद्ध सुनेत्राला उभे करणे चूकच
पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांकडून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली
वंचितसोबत आघाडीची चर्चा करण्यास तयार

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते गौरव
कडा । प्रतिनिधी
जिल्हा परिषद बीड आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2025 ने श्री. राहुल नामदेव डोंगर (सहशिक्षक) यांचा दिमाखदार सोहळ्यात सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. अजित (दादा) पवार यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
श्री. राहुल डोंगर हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जरेवाडी व कोतन (ता. पाटोदा, जि. बीड) येथे कार्यरत असून त्यांनी उत्कृष्ट तंत्रस्नेही अध्यापन, गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्य आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा अभियान, पी.एम. श्री शाळा उपक्रमांतर्गत विशेष कार्य, पटसंख्या वाढ, लोकसहभाग, सांस्कृतिक उपक्रम, शालेय बचत बँक, शैक्षणिक अभ्यास दौरे,इस्रो-नासा साठी विद्यार्थ्यांची निवड, ऑनलाईन चाचण्या तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळवून देण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत उल्लेखनीय यश संपादन केले असून सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. प्रा. शा. आंबेवाडी, जरेवाडी व कोतन येथील त्यांचे शैक्षणिक कार्य अत्यंत उत्कृष्ट ठरल्याने त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या यशाबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, लोकनेते गोपीनाथ मुंडे शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व संचालकांनी श्री. डोंगर सरांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नववर्षानिमित्त दि. 1 जानेवारी 2026 रोजी आयोजित या गौरव सोहळ्यास खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश आण्णा धस, आमदार प्रकाश सोळंके, आमदार विजय सिंह पंडित, आमदार संदीप भैय्या क्षीरसागर, जिल्हाधिकारी मा. श्री. विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. जितीन रहमान, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. किरण कुवर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व स्तरातून श्री. राहुल डोंगर सर यांच्या कार्याचे कौतुक होत असून त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS