Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिरूरच्या खासदारांची धरसोड भूमिका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा खासदार डॉ. कोल्हेंवर निशाणा

पुणे ः  शिरूर तालुक्यात काही राजकीय घटना घडल्या तिथल्या लोकप्रतिनिधी यांनी धरसोडी भूमिका घेतली त्यामुळे तेथील कार्यकर्त्यांनी आज पक्षात प्रवेश के

अशोक चव्हाण-अजित पवारांमध्ये ’गुफ्तगू’
बारामती जिंकण्यासाठी अजित पवारांनी रणशिंग फुंकले
इथेनॉल बंदी उठवण्यासाठी केंद्रासोबत चर्चा करू

पुणे ः  शिरूर तालुक्यात काही राजकीय घटना घडल्या तिथल्या लोकप्रतिनिधी यांनी धरसोडी भूमिका घेतली त्यामुळे तेथील कार्यकर्त्यांनी आज पक्षात प्रवेश केल्याचे ते म्हणाले. सोबतच मी कामाचा माणूस आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी इंदापूरच्या दौर्‍यावर आहेत. अजित पवारांचा आजचा इंदापूर दौरा महत्वाचा मानला जात आहे. अजित पवार इंदापुरात शेतकरी मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले आहे. अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रमध्ये गेलो तर काय चांगले आहे ते आपल्या भागात आणायचे कसे याचा विचार करतो, मी कामाचा माणूस आहे. इंदापूरच नाही तर पुणे जिल्ह्यातील पालकमंत्री म्हणून सगळे काम करतो. त्यात सगळी काम होणार याची खात्री करुन घेतो. कामे कशी करायची मला माहित आहे, कारण अंडी पिल्ले आपल्याला माहीत आहे. 40 कोटींचा पुणे जिल्ह्याच्या विकास आराखडा आज 1250 कोटींवर गेला आहे. अजित पवार म्हणाले की, मी आज इंदापूरमध्ये आलो आहे. कारण मला घरातून प्रचाराला सुरुवात करून राज्यभर प्रचाराला बाहेर पडायचे आहे. लोकसभेत महायुतीचे जास्तीत जास्त खासदार आपल्याला निवडून आणायचे आहेत. एनडीएमध्ये भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (आठवले) आहेत. यावेळी नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करायचे आहे. यासाठी मोदींच्या विचाराचा एक एक खासदार निवडून आला पाहिजे. अजित पवार म्हणाले की, यंदा राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळी जारी केले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे इंदापूर तालुका देखील दुष्काळी आहे. मी काल सात कालवे सल्लागार समित्या घेतल्या आहेत. माझी पण जात शेतकरी आहे आणि तुमची पण जात शेतकरी आहे. शेतकर्‍याला पाणी मिळाले पाहिजे.

COMMENTS