नवी दिल्ली : केंद्र सरकारने मंगळवारी महत्वपूर्ण निर्णय घेत केंद्र सरकारचे पंतप्रधान कार्यालय अर्थात पीएमओचे नाव बदलून सेवा तीर्थ केले आहे. तर देश

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मंगळवारी महत्वपूर्ण निर्णय घेत केंद्र सरकारचे पंतप्रधान कार्यालय अर्थात पीएमओचे नाव बदलून सेवा तीर्थ केले आहे. तर देशभरातील विविध राज्यांत असणार्या राजभवनचे नाव लोकभवन केले आहे. तसेच केंद्रीय सचिवालयाचे नाव ’कर्तव्य भवन’ असेल.
यासंदर्भात बोलतांना पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, ’आम्ही सत्तेकडून सेवेकडे वाटचाल करत आहोत.’ ’हा बदल प्रशासकीय नसून सांस्कृतिक आहे.’ ’सार्वजनिक संस्थांमध्ये मोठे बदल होत आहेत.’ यापूर्वी केंद्र सरकारने राजपथचे नाव बदलून ’कर्तव्य पथ’ केले होते. तर पंतप्रधान निवासस्थान आता ’लोक कल्याण मार्ग’ म्हणून ओळखले जाते. यापूर्वी पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान ’रेस कोर्स रोड’ म्हणून ओळखले जात होते, जे 2016 मध्ये बदलण्यात आले.

COMMENTS