Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’महाराष्ट्र केसरी’ची नवी ओळख महिला कुस्तीगिरांना मिळावी : दिपाली सय्यद

सातारा / प्रतिनिधी : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सातार्‍यातील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात सुुरु झाला आहे. याच पार्श्‍वभूमीवर श

लोणंदमध्ये तुंबलेल्या गटाराला मिळाली मुक्ती; दैनिक लोकमंथनच्या बातमीचा इफेक्ट
इस्लामपूरात दूषीत पाणी पुरवठ्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात : सुजित थोरात
विवाहित प्रेयसीसाठी बुरखा घालणार्‍या प्रियकरास चोर समजून बदडले

सातारा / प्रतिनिधी : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सातार्‍यातील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात सुुरु झाला आहे. याच पार्श्‍वभूमीवर शिवसेना नेत्या अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी आज खा. शरद पवार यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. दरम्यान, दिपाली सय्यद यांनी खा. शरद पवार यांच्याकडे महाराष्ट्रात महिला कुस्ती स्पर्धा भरवण्याची मागणी केली आहे.
आता खा. शरद पवार दिपाली सय्यद यांच्या मागणीवर काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दिपाली सय्यद यांनी मार्च महिन्यात सोलापूरमध्ये देखील यासंदर्भात भूमिका मांडली होती. दरम्यान, आता दिपाली सय्यद यांनी खा. पवार यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. दिपाली सय्यद यांनी शरद पवार यांना लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे. सर्व प्रथम महाराष्ट्र केसरी सुरू करून आपण कुस्तीगीरांना न्याय मिळवून दिलात या करिता आपली खूप आभारी आहे. दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही आपल्या कार्यात महिला कुस्तीगिरांच्या प्रगतीसाठी, तसंच महिला कुस्तीगिरांच्या शासकीय सेवा अशा अनेक विषयांत हातभार लावू इच्छितो. आपल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेमार्फत विविध राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धा घेतल्या जातात. परंतू पुरूष महाराष्ट्र केसरीप्रमाणे स्वतंत्र महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत नाही याची खंत आहे.
महाराष्ट्राला पुरुष महाराष्ट्र केसरी विचारले, तर जगजाहीर आहे. तसेच जर महिला महाराष्ट्र केसरी कोण? तरी अद्याप माहिती नाही. पुरुष महाराष्ट्र केसरीप्रमाणे स्वतंत्रपणे महिला महाराष्ट्र केसरीची नवीन ओळख महिला कुस्तीगीरांना मिळावी, हाच एकमेव उद्देश साध्य व्हावा याचसाठी हे प्रयोजन, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. महाराष्ट्रात महिलांसाठी स्वतंत्र महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत नाही. ही खंत असल्याचंही मत दिपाली सय्यद यांनी व्यक्त केले आहे.

COMMENTS