जागतिक परिस्थिती आव्हानात्मक आहे. अशा काळामध्ये प्रत्येक क्षेत्रात महिला नेत्या जर उदयास आल्या, तर, जग अधिक शांततापूर्ण आणि सहकार्यपूर्ण जीवन व्य

जागतिक परिस्थिती आव्हानात्मक आहे. अशा काळामध्ये प्रत्येक क्षेत्रात महिला नेत्या जर उदयास आल्या, तर, जग अधिक शांततापूर्ण आणि सहकार्यपूर्ण जीवन व्यतीत करील, अशी प्रतिक्रिया बौद्ध धर्म गुरु दलाई लामा यांनी व्यक्त केली आहे. लंडनमधील सध्या बिशप असणाऱ्या डेम सारा मुल्लाली या महिला धर्मगुरूला आर्चबिशप पदावर नियुक्ती केली जाणार असल्याचे संकेत, हे जगाच्या सध्याच्या काळामध्ये चांगले संकेत आहेत; असं बोलायला पाहिजे. आध्यात्मिक तथा जागतिक पातळीवरील धर्मगुरू नेते दलाई लामा यांनी लंडनच्या बिशप डेम सारा मुल्लाली यांना अँग्लिकन चर्चमधील सर्वोच्च पद असलेल्या कॅन्टरबरीच्या पुढील आर्चबिशप म्हणून नियुक्तीबद्दल अभिनंदन केले आहे. त्यांच्या अभिनंदन पत्रात, दलाई लामा यांनी डेम सारा मुल्लाल्ली यांची नियुक्ती “आशेचा किरण” म्हणून वर्णन केली. कोणताही धर्म दया, क्षमा आणि करुणा शिकवतो. त्यामुळे या गुणांचा जर विकास झाला तर, समाज अधिक शांततापूर्ण जीवन जगू शकतो. आज जगातील प्रश्न फार बिकट झाले आहेत आणि सर्वत्र परिस्थिती आव्हानात्मक आहे, असे वाटते. अर्थात दलाई लामा हे धार्मिक नेते असले तरी जगाचा एकूण अन्वयार्थ लावताना कोणताही धर्म हा मानवी समाजाला शांततापूर्ण जीवन व्यतीत करीत असताना, ज्यांची अवस्था वाईट आहे, त्यांच्या प्रति करूणा आणि दया भाव ठेवण्यास सांगतो. त्यासाठी त्यांना मदत करण्याची ही शिकवणही जगातील कोणताही धर्म देतो. मात्र या सगळ्या गोष्टी निसर्गतः आहात स्त्री व्यक्तिमत्वामध्ये असतात. प्रकटपणे असतात. म्हणून जर सध्याच्या आव्हानात्मक जगाच नेतृत्व स्त्रियांचे हाती दिले, तर, जग अधिक शांततापूर्ण आणि समृद्धीच्या दिशेने वाटचाल करणार. त्यामध्ये मानवता ही प्रधान राहील. जगातील सर्वत्र प्रश्न बिकट होत असताना जगभरातील देशांमध्ये हिंसाचार उफाळला आहे. याची अनेक कारण आहेत. परंतु मुख्य कारण जगाची आर्थिक घरी विस्कटलेली आहे आणि ही आर्थिक घडी विस्कटण्याचं कारण, भांडवलदारांना जो अति आत्मविश्वास होता की, आपल्या भांडवली व्यवस्थेमुळे आपण जगाला शांततापूर्ण विकासाकडे आणि भांडवली लोकशाहीकडे समृद्धपणे घेऊन जाणारा आहोत; हा जो अतिआत्मविश्वास होता, तो आता बारगळला आहे. जगातले सगळे भांडवलदार भांडवली व्यवस्था ही एका अरिष्टात सापडली आहे. नुकताच राहुल गांधी यांनी देखील दक्षिण अमेरिकेचा केलेला दौरा, हा देखील त्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. ज्या चार देशांना राहुल गांधी यांनी भेटी दिल्या, त्या चारही देशांमध्ये सध्याची राजकीय राजवट ही कम्युनिस्ट आहे. या राजवटीतून त्यांनी केलेला संदेश एक प्रकारे जगाच्या भांडवलशाहीला आव्हान आहे काय? पूर्णपणे भांडवलशाहीवर आधारलेली शोषण व्यवस्था ही जगाच्या कल्याणाची नाही, हे देखील या नवराजकीय नेतृत्वाला उमगले आहे का? हे देखील त्यामधून समजून घेण्याची परिस्थिती आहे. मात्र, दलाई लामा यांनी धार्मिक नेत्यांच्या भूमिकेवर भर देताना म्हटले की, “मला वाटते की धार्मिक नेते म्हणून, ही मूलभूत मानवी मूल्ये जनतेच्या लक्षात आणून देण्याची आपली विशेष जबाबदारी आहे. सर्व धर्म क्षमा, संयम आणि करुणा शिकवतात आणि त्यांचा विकास कसा करायचा हे दाखवतात.”अर्थात दलाई लामा आणि ख्रिश्चन धर्माच्या धर्मगुरू असलेल्या डेम सारा मुल्लाली यांचं बिशप पदावरून आर्च बिशप पदावरची व असणारी नियुक्ती ही ख्रिश्चन धर्मातील धर्मगुरू असणाऱ्या क्षेत्रात महिलांचा एक विशेष शिरकाव किंवा धर्मक्षेत्रातील वरच्या पदांना पादाक्रांत करणाऱ्या महिलांचा आज जागतिक पातळीवर विशेष सन्मान आहे; अशा प्रकारच्या भावना दलाई लामा यांनी व्यक्त केल्या आहेत. डेम सारा मुल्लाल्ली यांना लिहिलेल्या पत्रात दलाई लामा यांनी सध्याच्या जागतिक आव्हानांबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी लिहिले की, “आज जग अनेक अडचणींना तोंड देत आहे. हा असा काळ आहे जेव्हा मूलभूत मानवी मूल्यांना आव्हान दिले जात आहे.” ही चिंता केवळ दलाई लामा यांचीच नाही; तर, आज पूर्ण जगाच्या चिंतेत भर बनली आहे.

COMMENTS