Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेअर बाजाराने नोंदवला नवा विक्रम

प्रथमच सेन्सेक्सने गाठला 84 हजारांचा ठप्पा

मुंबई ः गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात चढ-उतार सुरू असतांनाच शुक्रवारी मात्र शेअर बाजाराने नवा विक्रम नोंदवला आहे. शेअर बाजारात सलग दुसर्‍य

अर्थमंदीची चाहूल !
चांदवड देवळा विधानसभा मतदार संघात प्रहार कडून गणेश निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर 
दुर्देवी ! साप चावून दोन्ही भावंडांचा मृत्यू.

मुंबई ः गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात चढ-उतार सुरू असतांनाच शुक्रवारी मात्र शेअर बाजाराने नवा विक्रम नोंदवला आहे. शेअर बाजारात सलग दुसर्‍या दिवशी नवा सार्वकालिक उच्चांक नोंदवत इतिहासात प्रथमच बीएसई सेन्सेक्सने 84 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली.
 देशांतर्गत शेअर बाजाराने शुक्रवारी सलग दुसर्‍या दिवशी नवा सार्वकालिक उच्चांक गाठला. अल्पावधीतच बाजारात जबरदस्त तेजीची नोंद झाली आहे. इडए सेन्सेक्सने इतिहासात प्रथमच 84 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सेन्सेक्सने प्रथमच 84,100 चा टप्पा ओलांडून नवा विक्रम रचला आहे. याआधी गुरुवारीही सेन्सेक्सने विक्रमी उच्चांक गाठला होता. सेन्सेक्सशिवाय निफ्टीनेही विक्रमी उच्चांक गाठला आहे. निफ्टी नवीन शिखरावर आहे आणि प्रथमच 25,650 च्या पुढे गेला आहे. सकाळी सेन्सेक्स 350 अंकांनी तर निफ्टी जवळपास 100 अंकांनी वर होता. काही मिनिटांनंतर, , सेन्सेक्स 175 अंकांवर आला होता आणि 83,370 अंकांच्या जवळ व्यवहार करत होता. त्यानंतर व्यापारादरम्यान, बाजाराने चांगले पुनरागमन केले आणि 900 अंकांनी उडी मारून नवीन विक्रमी उच्चांक केला. सकाळी 11 वाजता सेन्सेक्सने 900 हून अधिक अंकांच्या नेत्रदीपक वाढीसह 84159 चा टप्पा ओलांडला. इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्स 84 हजारांवर पोहोचला आहे. तसेच निफ्टी 25,663.45 अंकांची उच्च पातळी गाठल्यानंतर 11 वाजता सुमारे 225 अंकांच्या वाढीसह 25,645 अंकांवर व्यवहार करत होता.

गुंतवणूकदारांनी कमावले 4 लाख कोटी – बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांनाही मोठा नफा झाला आहे. काल बीएसई लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 4,65,47,277 कोटी रुपये होते, ते शुक्रवारी 4 लाख कोटी रुपयांनी वाढून 4,69,33,988 कोटी रुपये झाले आहे. गुरुवारीही देशांतर्गत बाजाराने नवीन उच्चांक गाठला होता. कालच्या व्यवहारात, सेन्सेक्सने 83,773.61 अंकांची नवीन सार्वकालिक उच्च पातळी गाठली आणि निफ्टीने 25,611.95 अंकांची नवीन सार्वकालिक उच्च पातळी गाठली. नंतर प्रॉफिट बुकींगमुळे मार्केट थोडे खाली आले.

COMMENTS