Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वसंत रांधवण यांना निर्भिड पत्रकार पुरस्कार जाहीर

सुपे ः पारनेर तालुक्यातील टाकळीढोकेश्‍वर येथील पत्रकार तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष वसंत रांधवण यांची राज्

वसंत रांधवण यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर
वसंत रांधवण राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानीत
वसंत रांधवण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

सुपे ः पारनेर तालुक्यातील टाकळीढोकेश्‍वर येथील पत्रकार तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष वसंत रांधवण यांची राज्यातील अक्षराज मीडिया समुह यांच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय निर्भिड पत्रकारिता पुरस्कार 2024 करीता नुकतीच निवड करण्यात आली असल्याची माहिती अक्षराज मेडिया समुहाचे अध्यक्ष व मुख्य संपादक विनोद गोरे व सहसंपादिका प्राजक्ता चव्हाण-गोरे  यांनी दिली.
बुधवार 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, सदाशिव पेठ, पुणे या ठिकाणी विविध क्षेत्रातील नामवंत लेखक आणि मान्यवरांच्या हस्ते दैनिक अक्षराज वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निर्भिड पत्रकारिता पुरस्कार 2024 देऊन वसंत रांधवण यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पत्रकारिता क्षेत्रात गेल्या काही वर्षांतील सातत्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल आम्ही अक्षराज मीडिया समुहाकडून वसंत रांधवण यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आला असल्याचे मुख्य संपादक विनोद गोरे यांनी सांगितले आहे.

COMMENTS