Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो, सत्ताधारी हरत असतात हा पराभव स्वभावाचा आणि वागणुकीचा पराभव आहे- राज ठाकरे 

कल्याण प्रतिनिधी - ५ जूनपासून ठाणे जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळा घेतल्या जातील. त्यानंतर महिनाभरात कशा गोष्टी राबवल्या जातायत ते बघू.

एकदा माझ्या हातात हे राज्य द्या, सर्व भोंगे एकसाथ बंद करतो- राज ठाकरे
टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा ः राज ठाकरे
मनोहर जोशींच्या निधनावर राज ठाकरेंची भावनिक प्रतिक्रिया

कल्याण प्रतिनिधी – ५ जूनपासून ठाणे जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळा घेतल्या जातील. त्यानंतर महिनाभरात कशा गोष्टी राबवल्या जातायत ते बघू. अनेक पदांना त्यांचं नेमकं काम काय आहे ते माहीत नाहीये, ते सांगितलं जाईल.

विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो, सत्ताधारी हरत असतात. हा पराभव स्वभावाचा आणि वागणुकीचा पराभव आहे. आपलं कुणी वाकडं करू शकत नाही, या विचाराचा हा पराभव आहे. जनतेला कधीही गृहीत धरू नये, हा या निकालातून सर्वांनी बोध घेण्यासारखा आहे आणि तो सर्वांनी घ्यावा.

– याबाबत आता काय बोलणार? आता निकाल लागलेला आहे यावरून आताच उडी मारू नका.

-सगळ्या चॅनेलवाल्यांनी आणि त्यांच्या मालकांनी कितीही दाबण्याचा प्रयत्न केला, तरी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा हा परिणाम दिसतो आहे. 

– हे आता सांगायला मी काय ज्योतिषी आहे का?

– यापुढे गटबाजी होणार नाही. यासाठीच मी दौऱ्यावर आलो आहे. मी कोणत्याही व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षा पुऱ्या करण्यासाठी पक्ष काढलेला नाही. ज्यांना स्वतःच्या अहंपणामध्ये जगायचं असेल, ते यापुढे पदावर राहणार नाहीत.

ON सुधीर मुनगंटीवार

– तुमच्याकडून चूक झाली ती झाली. उगाच कुणाला तरी धडे शिकवायला जाऊ नका. तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या, त्या नंतर हे  महाराष्ट्राचं राजकारण असे  झालेले आहे. त्यामुळे आता या सारवासारवीला काही अर्थ नाही.

COMMENTS