जुन्या नव्या पाण्याच्या टाकी संदर्भात चुकीची माहिती देऊन विपर्यास  : नवले, साळवी, खंडागळे यांचा खुलासा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जुन्या नव्या पाण्याच्या टाकी संदर्भात चुकीची माहिती देऊन विपर्यास : नवले, साळवी, खंडागळे यांचा खुलासा

तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी ४ कोटी १७ लाख रुपये खर्चाच्या अंदाज पत्रकात उंच पाण्याच्या टाकीचे बांधकाम धरलेच नाही तर पाण्याच्या टाकीत खोडा घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही

मुलंही आईपेक्षा मोबाईलच्या सहवासात शांत राहतात हा मातृत्वाचा पराजय:- गणेश शिंदे
प्रहारचा मराठा आरक्षण आमरण उपोषणाला पाठिंबा
देशमुखांवर गुन्हा दाखल असून चौकशी सुरू : सीबीआयचा खुलासा l DAINIK LOKMNTHAN

बेलापूर /प्रतिनिधी : तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी ४ कोटी १७ लाख रुपये खर्चाच्या अंदाज पत्रकात उंच पाण्याच्या टाकीचे बांधकाम धरलेच नाही तर पाण्याच्या टाकीत खोडा घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तसेच पाण्याची टाकी पाडण्याबाबतचा विषय हा कुठल्याच मिटिंग मध्ये झालेला नाही, जुन्या पाण्याच्या टाकी बांधकामाबाबत विरोधकांनी चुकीची माहिती गावापुढे मांडून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा खुलासा जि.प.सदस्य शरद नवले व सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी पत्रकार परिषदेत केला. 

 बेलापूर येथील पाण्याच्या टाकीबाबत विरोधाकाकडून दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध झाल्याबद्दल बेलापूर बु.ग्रामपंचायत येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करून पत्रकारांना सर्व कागदपत्रे पुराव्यासह हाती देण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य शरद नवले म्हणाले कि माझे सरपंच पदाच्या कार्यकाळात १.५ MLD क्षमतेचा फिल्टर प्लॅन्ट बांधला होता तो  फिल्टर प्लॅन्ट वेळोवेळी वॉश आउट न केल्यामुळे गावाला दुषित पाणी प्यावे लागले. तसेच वॉश आउट न केल्यामुळे व त्याची देखभाल न केल्यामुळे फिल्टर प्लॅन्ट खराब झाला तसेच फिल्टर प्लॅन्ट ग्रामपंचायतींने बांधलेला आहे, असे तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी  प्रस्त्वावित केलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकात का लिहून दिले? त्यामुळे फिल्टर प्लॅन्ट गायब झाले या आरोपात तथ्य नाही. या पाण्याच्या टाकी बाबत काही दुर्घटना घडली असती तर गावाच्या पाणी पुरवठ्याचे काय? असा सवालही नवले यांनी उपस्थित केला असून स्वतःचे  पाप झाकण्यासाठी खोटे- नाटे बिन- बुडाचे आरोप करत आहे. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी पाण्याच्या टाकीचे काम वेळीच हाती घेतले असते तर हा प्रश्नच उपस्थित झाला नसता. या परिसरात अनेक वेळा शाळा, महाविद्यालय यांच्या सहली व गोरगरीबांचेही लग्नही पार पडलेले आहे. अशा वेळी जर काही दुर्घटना घडली असती तर त्यास जबाबदार कोण राहिले असते असा प्रश्नही नवले यांनी उपस्थित केला.

यावेळी बोलताना सरपंच महेंद्र साळवी म्हणाले कि मी उपसरपंच असताना आलेले टाकीबाबतचे ते पत्र कुठल्याही बैठकीत समोर आणले नाही, तसेच कुठल्याही बैठकीच्या इतिवृत्तात याची नोंद नाही. माझी सरपंच म्हणून निवड झाल्यानंतर कागदपत्रे पाहताना टाकी बाबतचे ते पत्र वाचण्यात आले. त्या पत्राचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर पत्राबाबतची चर्चा मासिक सभेमध्ये घडवून आणून सदरचा विषय गावासमोर आणला. तत्कालीन सत्ताधारी सांगतात कि १३ कोटी रुपयाची योजना प्रस्तावित केली होती परंतु दप्तरी याबाबत कुठलाही पुरावा सापडत नाही. केवळ जनतेची दिशाभूल करण्याची कामे विरोधक करत आहे. वास्तविक पाण्याच्या टाकी संदर्भात त्या काळात जे सरपंच होते त्यांनीच खुलासा देणे आवश्यक असताना निवडणुकीत ज्यांना जनतेने नाकारले तेच खुलासा देत आहे.या सारखे दुर्दैव काय  नवीन टाकी बांधकामासाठी २ वर्षांचा कालावधी लागणार असल्याने या काळात दुर्दैवाने टाकी पडली व काही दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण व गावाला पाणी पुरवठा कसा होणार असा सवालही सरपंच साळवी यांनी उपस्थित केला.  यावेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे म्हणाले कि, बेलापूर गावाचे सर्व माजी दिवंगत सरपंचाच्या बाबत आदरच असून त्या सर्वांनी गावाला दिलेले योगदान फार महत्वाचे आहे. परंतु जुन्या पाणी पुरवठा योजनेबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर  होणे आवश्यक आहे. बेलापूर बु. पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन दिवंगत सरपंच कै.घमाजी कुऱ्हे यांचे कार्यकाळात सन १९७१ साली झाले होते. परंतु पाणी पुरवठा योजनेसाठीची लोकवर्गणी भरलेली नव्हती व पाण्याच्या तळ्यासाठीची जागा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित झालेली नव्हती. माजी सरपंच कै.भागवतराव खंडागळे यांच्या कार्यकाळात सन १९७२ ते १९७७ या कार्यकाळात पाणीपुरवठा योजनेची लोकवर्गणी भरण्यात आली. त्याच प्रमाणे पाणीपुरवठा योजनेची सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. तसेच पाण्याच्या तळ्यासाठीची जागा शेती महामंडळाकडून हस्तांतरित करण्यात आली. पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले नंतर ग्रामदैवत श्री हरिहर केशव गोविंदास नळातून आलेल्या पाण्याचा अभिषेक करून सदर योजनेचे औपचारिक उद्घाटन सन १९७७ ला कै.भागवतराव खंडागळे यांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात करण्यात आले. तसेच याच साली पाणी पुरवठ्याचे खाजगी कनेक्शन देनेबाबत नियमावली बनविण्यात आली. सदरील योजना ग्रामपंचायतीकडे तांत्रिक स्टाफ नसल्याने १ वर्षाकरिता शासनाच्या जीवन प्राधिकरणाद्वारे चालविण्यात आली. कै.खंडागळे सरपंच असताना १ वर्ष गावाला पाणीपुरवठाही झाला. पुढे सन १९७८ साली ती योजना शासनाने ग्रामपंचायतीकडे वर्ग केली. जनतेच्या पैशावर डल्ला मारणारा पुढारी होण्यापेक्षा विकास कामांची माहिती लोकांपर्यंत पोहचवणारा व्हॉट्सअॅप पुढारी होणे आम्हा सत्ताधारी ११ सदस्यांना मान्य आहे असा टोलाही श्री.खंडागळे यांनी लगावला. या सर्व विषयांच्या संदर्भात नागरिकांना माहिती हवी असल्यास त्यासंदर्भातील सर्व कागदपत्रे ग्रामपंचायतीकडून माहितीसाठी उपलब्ध करुण देण्यात येतील असे अवाहन जि.प.सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केले आहे. सदरील पत्रकार परिषदेस ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले, मुस्ताक शेख, रमेश अमोलिक, सौ.प्रियांका कुऱ्हे, अशोक गवते, सचिन अमोलिक, प्रभात कुऱ्हे आदी उपस्थित होते.

COMMENTS