वर्षभरात 25 हजार किमीचे महामार्ग बांधणार

Homeताज्या बातम्या

वर्षभरात 25 हजार किमीचे महामार्ग बांधणार

नवी दिल्ली/प्रतिनिधी : कोरोनाची लाट ओसरत असतांना या अर्थसंकल्पात पायाभूत सोयी सुविधांवर भर देण्यात येत असून, यंदाच्या अर्थसंकल्पात रस्ते विकासासाठी म

Ratnagiri : युवासेनेचे महागाईच्या विरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन (Video)
ग्रामपंचायत सदस्याच्या कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
दिग्गज अभिनेत्री तनुजा यांची प्रकृती बिघडली

नवी दिल्ली/प्रतिनिधी : कोरोनाची लाट ओसरत असतांना या अर्थसंकल्पात पायाभूत सोयी सुविधांवर भर देण्यात येत असून, यंदाच्या अर्थसंकल्पात रस्ते विकासासाठी मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या इतर अनेक घोषणांसोबत देशात पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यासाठी लक्ष्य ठरवण्यात आलं असून देशात तब्बल 25 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग उभे करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.

COMMENTS