Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहावीचा निकाल आज होणार जाहीर  

पुणे/प्रतिनिधी ः बारावीच्या निकालानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांना होती, मात्र ही उत्सुकता आता संपली असून, दहावीचा निक

शहरातील घातक कचर्‍याचा प्रश्न गंभीर
थट्टा मस्करी केल्याच्या रागातून मित्रानेच केला मित्राचा खून
राज ठाकरे म्हणाले.. लसीकरण झाल्यावरच शाळा उघडा

पुणे/प्रतिनिधी ः बारावीच्या निकालानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांना होती, मात्र ही उत्सुकता आता संपली असून, दहावीचा निकाल आज शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षण मंडळातर्फे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आजशुक्रवारी (दि.2) दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पुढील काही तासात निकाल पाहता येणार आहे. राज्य मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थी बसले होते. त्यात 8 लाख 44 हजार 116 मुले आणि 7 हजार 33 हजार 067 मुलींचा समावेश होता. राज्यभरातील 5 हजार 33 केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. दहावीचा निकाल केव्हा जाहीर होणार याबाबत विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली होती. 2 जूनला निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन निकालाची ऑनलाईन प्रिंटआऊट काढून घेता येणार आहे. मात्र,आता निकालाची तारीख जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांची उत्कंठा अधिकच वाढली आहे.

COMMENTS