Homeताज्या बातम्या

एसटीच्या ताफ्यात 150 विद्युत बस दाखल होणार

मुंबई ः इंधनावरील होणारा वाढीव खर्च कमी करण्यासाठी, वाढत्या प्रदूषणाला अटकाव करण्यासाठी एस.टी. महामंडळाने विद्युत बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला

हेरगिरी करणारा आणखी एक युट्यूबर अटकेत
भारताचे शुक्रयान 2028 मध्ये होणार लाँच
भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला वीज खरेदी करण्यास मान्यता

मुंबई ः इंधनावरील होणारा वाढीव खर्च कमी करण्यासाठी, वाढत्या प्रदूषणाला अटकाव करण्यासाठी एस.टी. महामंडळाने विद्युत बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 150 बस खरेदी करण्यात येणार आहेत. मार्च अखेरपर्यंत 75 बस येणार आहेत. त्यापैकी 50 बस मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर धावणार आहेत.
मुंबई-पुणे महामार्गासह इतरही मार्गांवर विद्युत प्रभारणाची (चार्जिंग) सोय केली जाणार आहे. दुसर्‍या टप्यात, 2024 मध्ये एसटीच्या ताफ्यात 5000 विद्युत बस विकत घेण्याचे लक्ष्य निश्‍चित करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात एसटी प्रशासनाकडून शिवाई विद्युत बस धावणार्‍या महामार्गावर विद्युत प्रभारण स्थानके सुरू करण्यात येणार आहेत. मार्च अखेरीस येणार्‍या या बस प्राधान्याने विद्युत प्रभारण स्थानके असलेल्या ठिकाणी चालवण्यात येणार आहेत. सध्या बोरिवली, ठाणे, स्वारगेट, नाशिक, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर येथे बससाठी विद्युत प्रभारण स्थानके आहेत, अशी माहिती एस.टी. महामंडळातील अधिकार्‍याने दिली.

COMMENTS