Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशात यंदा 96 टक्के पाऊस होणार

भारतीय हवामान विभागाचा अंदाज

मुंबई/प्रतिनिधी ः नुकताच स्कायमेट या हवामान संस्थेने भारतात सरासरीपेक्षा 94 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला हेता. त्यानंतर मंगळवारी भारतीय हवाम

कर्जत आणि जामखेडला होणार महिला समुपदेशन केंद्र ; प्रस्ताव पाठविण्याचे स्वयंसेवी संस्थांना आवाहन
परळी बस स्थानकातील हिरकणी कक्षाची दुरावस्था
विषारी फेसानं कोंडतोय इंद्रायणी नदीचा श्वास

मुंबई/प्रतिनिधी ः नुकताच स्कायमेट या हवामान संस्थेने भारतात सरासरीपेक्षा 94 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला हेता. त्यानंतर मंगळवारी भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवला असून, यंदा देशात 96 टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
यंदा देशात 870 मिमी पाऊस म्हणजेच सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार आहे. तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा हवामान विभागाचा दीर्घकालीन अंदाज आहे. देशात यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान 835 मिमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 96 ते 104 टक्क्यांच्या दरम्यान होणार्‍या पावसाला सामान्य पाऊस म्हटले जाते.महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. दरवर्षी शेतकर्‍यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतिक्षा असते. सगळे शेतकरी नेमका हवामान विभागाचा काय अंदाज येईल याची वाट बघत असतात. अखेर हवामान विभागाचा अंदाज आज जाहीर झाला आहे. दरम्यान हा भारतीय हवामान विभागाचा पहिला दीर्घकालीन अंदाज आहे. पुढचा सुधारीत पावसाचा अंदाज हा मे महिन्याच्या शेवटी वर्तवण्यात येणार आहे. त्यानंतर मान्सूनसंदर्भातील चित्र आणखी स्पष्ट होणार आहे.  

COMMENTS