Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनात देशभक्ती आणि सेवाशक्ती असावी ः प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः सर्वसामान्य माणसांच्या मनात देशभक्ती आणि सेवाशक्ती ओतप्रत भरलेली असते. तरुण वयात वाचन,समाजचिंतन,आदर्श व्यक्तिमत्वाचा प्रभा

मनपामध्ये उभारणार सिंहासनाधिष्ठीत शिवपुतळा
कडक टाळेबंदी पाळणे सर्वांच्या हिताचे : नगराध्यक्ष वहाडणे
सततच्या लॉकडाउनला भाळवणीकर वैतागले, व्यापारी वर्गात प्रशासनाविरुद्ध संताप

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः सर्वसामान्य माणसांच्या मनात देशभक्ती आणि सेवाशक्ती ओतप्रत भरलेली असते. तरुण वयात वाचन,समाजचिंतन,आदर्श व्यक्तिमत्वाचा प्रभाव, देतो तो देवची उदात्त भावना आणि मी समाजसेवक होणार अशी पंचसूत्र तो मनाशी बांधतो, पण प्रचंड गरिबी,संसाराचा भार आणि खोटे स्तुतीपाठक भरपूर असतात, अशावेळी आपला सेवाभाव जपताना ’जेवढी चादर तेवढेच पाय पसरावे ’असे मत माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे यांनी व्यक्त केले.
  येथील मार्केट यार्ड परिसरातील शेळके सभागृहात ’आजचा युवक आणि समाजसेवा ’या विषयावर भूमी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य सेवाभावी संस्था व वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे परिसंवाद आणि समाजवास्तव चर्चा आयोजित करण्यात आली होती.त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. गागरे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य टी. ई. शेळके, विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे, प्रा. शिवाजीराव बारगळ आदी उपस्थित होते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत,प्रास्ताविक केले. भूमी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. कैलास पवार यांना पुणे येथील सतेज इंडिया प्रा. लि. चा राज्यस्तरीय आदर्श समाजरत्नभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य शेळके, प्राचार्य डॉ. गागरे यांच्या हस्ते शाल, बुके, पुस्तके, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.प्रा. कैलास पवार यांनी भूमी फौंडेशनचे कार्य आणि पुरस्कारमाहिती दिली. आपण आता कृषीसमाज जीवनातील निराधार मुलाचा आश्रम सुरु करीत असून त्यासाठी समाजाने योगदान द्यावे असे आवाहन केले.प्राचार्य डॉ. गागरे यांनी भूमी फाऊंडेशन, वाचन संस्कृती प्रतिष्ठान यांच्या कार्याचे कौतुक केले.चांगले काम करताना अनेक अडचणी येतात.आपले कार्य ह दिशादर्शक आणि केंद्रीभूत असले तरच छान होते. एक ना धड भारामभार चिंद्या असे होणे नको आहे, आपली सांसारिक जबाबदारी, नोकरी ठिकाणचा प्रामाणिकपणा जपत आपली कुवत असेल तेवढेच ध्येय समोर     ठेवले तरच ते पूर्णत्वास जाते, समाधानाचे होते असे सांगितले. सुखदेव सुकळे प्रा.बारगळ यांनीही सेवा आणि जबाबदारी याविषयीं मनोगत व्यक्त केले. प्राचार्य शेळके यांनी अध्यक्षीय भाषणातून आदर्श तत्वे आणि समाजसेवा याविषयीं विवेचन करून भूमी फौंडेशनने निर्मिक कार्य हाती घ्यावे असे सुचविले. सूत्रसंचालन डॉ. उपाध्ये यांनी केले तर आरोग्यमित्र भीमराज बागुल यांनी आभार मानले.

COMMENTS