पांढरीपुलावर कंटेनर धडकेत टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू

Homeताज्या बातम्या

पांढरीपुलावर कंटेनर धडकेत टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर-औरंगाबाद महामार्गावरील पांढरी पूल परिसरात अपघाताच्या घटना सातत्याने होत आहे. सोमवार, दि. 11 रोजी झालेल्या कंटेनरच्या अपघातात

करोडोंचा दानधर्म, पाहा अक्षय कुमारची संपत्ती किती? l पहा LokNews24
जोहरापूरात बंद घर चोरट्यांच्या निशाण्यावरसाडेचार लाखांचे दागिने व रोकड लंपास ; तपास सुरू
नगर अर्बनच्या त्या ठेवीदारांनी न्यायालयात जाण्याची गरज

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर-औरंगाबाद महामार्गावरील पांढरी पूल परिसरात अपघाताच्या घटना सातत्याने होत आहे. सोमवार, दि. 11 रोजी झालेल्या कंटेनरच्या अपघातात एका टेम्पोचालकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची अधिक माहिती अशी की, मालवाहू टेम्पो (क्रमांक एम.एच. 12 क्यु.जी.1217) यावरील टेम्पोचालक याने रस्त्याच्या कडेला टेम्पो उभा करून रस्त्याच्या बाजूला उभा असताना त्याला नगरकडून औरंगाबादकडे जाणार्‍या कंटेनरने (क्रमांक आर.जे. 32 जी.बी. 0003) जोराची धडक दिली. धडक इतकी जोरात होती की त्या धडकेत टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. मृत टेम्पोचालकाची ओळख अद्याप पटली नव्हती. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

COMMENTS