प्रवरेच्या कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयामध्ये पेरू दाब कलम कार्यशाळा संपन्न

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रवरेच्या कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयामध्ये पेरू दाब कलम कार्यशाळा संपन्न

लोणी दि.६प्रतिनिधी    पद्मभूषण उपाधीने सन्मानित लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील  प्रवरा ग्रामीण शिक्षणसंस्थेच्या लोणी येथील कृ

तीन पिढ्या श्रमदान करताना पाहून आनंद वाटला ः जिल्हाधिकारी सालीमठ
छत्रपती संभाजीराजांना नगरमध्ये अभिवादन…
थोरात कारखान्याच्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ

लोणी दि.६प्रतिनिधी

   पद्मभूषण उपाधीने सन्मानित लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील  प्रवरा ग्रामीण शिक्षणसंस्थेच्या लोणी येथील कृषी व कृषीसंलग्नित  महाविद्यालयामध्ये विद्यार्थी आणि शेतकऱ्यासाठी एक दिवशीय पेरू दाब कलम कार्यशाळा  संपन्न झाली..

      पेरू  दाब कलम  करत असताना पेरूच्या झाडाची एक वर्ष वयाची पेन्शीलच्या जाडीची फांदी दाब कलमासाठी निवडावी. जो भाग मातीने भरलेल्या पॉलिथीन पिशवीत गाडावयाचे आहे. त्यावरील पाने काढून टाकावी. मात्रृवृक्ष फांदी अशा पध्दतीने बांधावी की तिचा शेंड्याकडील भाग जमिनीस टेकणे आवश्यक आहे. जो भाग मुळ्या फुटण्याकरिता पॉलिथीन पिशवीत गाडावयाचा  त्या फांदीच्या शेंड्याकडील देशेने जिभलीसारखा २.५ ते ५ सेमी लांबीची  काप घ्यावा. काप घेतलेल्या फांदीची जिभली उघडी राहावी म्हणून बारीक  काडी घालावी. मातीने भरलेल्या पॉलिथीन पिशवी घेऊन जिभली छाट दिलेला भाग मातीत पुरावा व फांदीवर  दगड ठेवावा किवा सुतुळीने बांधावा. काप  देलेला भाग मातीशी कायम संपर्कात राहील याची काळजी घ्यावी. पॉलिथीन पिशवीतील माती ओलसर राहील अशी व्यवस्था करावी. पिशवी पडू नये म्हणून बाजूने माती लावावी. मात्रृवृक्षाच्या कडेने आळे करावे व पाणी द्यावे अशा पद्धतीने कलमे केल्यास २-३ महिन्यात  मुळ्या लवकर फुटण्याची आयबीए ४०० ते ५०० पीपीएम हे संजीवक पण वापरतात कलम मात्रृवृक्षापासुन वेगळे करण्यापूर्वी पंधरा दिवस अगोदर ५० % काप घ्यावा. त्यानंतर रोप ५०%   शेडनेट  ठेवावे. कलमाची  जूनी पाने काढून टाकावीत. हवेत आद्रता असेल तर कलमे यशस्वी होण्याचे प्रमाण चांगले प्रमाण मिळते म्हणून जून ते सेप्टेंबर या कालावधीत कलमे करावी अशी माहिती प्रा. आश्विनी घाडगे आणि प्रा. विशाखा  देवकर यांनी दिली.

    या प्रसंगी कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रोहित उंबरकर, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य. प्रा. ऋषिकेश औताडे आणि कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य. प्रा. निलेश दळे उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी प्रा. देवरे  मॅडम आणि डॉ.  प्रतिभा विखे तसेच विद्यार्थी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पेरू  दाब कलम  कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रा. अश्विनी घाडगे  सहाय्यक प्राध्यापक उद्यानविद्या  विभाग  कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय  व प्रा. विशाखा  देवकर सहाय्यक प्राध्यापक उद्यानविद्या  विभाग  कृषी महाविद्यालय  लोणी तसेच   सुनील कानडे आणि   प्रशांत आहेर  यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS