सोमनाथ जंगम यांचा डॉक्टर ऑफ सोशल वर्क किताबाने सन्मान

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोमनाथ जंगम यांचा डॉक्टर ऑफ सोशल वर्क किताबाने सन्मान

अहमदनगर : अहमदनगर शहरात केडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ जंगम (देवा) यांना साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीच्या वतीने डॉक्टर ऑफ सोशल वर्क य

आ लंके यांचे मुंबई त चर्चा खा सुप्रिया सुळे यांच्याकडून कौतुक | Nilesh Lanke | आपलं नगर | LokNews24
महापालिकेच्या वतीने पाईपलाईन रोड येथील चौकाचे कै.शंकरभाऊ वाणी नामकरण
कोरोना उपाययोजनांना पहिले प्राधान्य : नूतन महापौर रोहिणी शेंडगे यांनी घेतला पदभार

अहमदनगर : अहमदनगर शहरात केडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ जंगम (देवा) यांना साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीच्या वतीने डॉक्टर ऑफ सोशल वर्क या मानाच्या किताबाने गौरवि ण्यात आले. सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्काररुपी किताब बहाल करण्यात आला.

पोंडीचरी येथे झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात मदरास उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती के.स्वामीदुराई,सिनेसृष्टीतील दिग्दर्शक तथा अभिनेते रवी मारिया,डॉ.चिन्नी जयंता,डॉ.डी.एस.लॉरेन्स,डॉ.सुरेश बाबू,जॉन पिटर यांच्या हस्ते जंगम (देवा) यांना डॉक्टर ऑफ सोशल वर्क या मानाच्या किताब बहाल करण्यात आला.सोमनाथ जंगम (देवा) सामाजिक ऐक्यासाठी जातीय सलोख्याचे विविध कार्यक्रम राबवित असतात.तसेच त्यांचे सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य सुरु आहे. स्त्री जन्माचे स्वागत,वृक्षरोपण,स्वच्छता अभियान,महिला सक्षमीकरण,जलसंधारण जागृती मोहिम व रक्तदान शिबीराचे आयोजन व सहभाग या कार्याची दखल घेत त्यांना सदर पुर स्कार प्रदान करण्यात आला आहे.सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

COMMENTS