सरणानेही ढाळले अश्रू मरण पाहुनी…

Homeशहरंनाशिक

सरणानेही ढाळले अश्रू मरण पाहुनी…

सुरगाणा/ प्रतिनिधी सरण ही थकले मरण पाहुनी. मरणानंतरही भोगाव्या लागतात नरक यातना.. या कवितेचा भावार्थ  प्रत्यक्ष  सुरगाणा तालुक्यातील

सगळ्या निवडणूक प्रक्रियेची थट्टा करून टाकली आहे… राज ठाकरेंचा घणाघात
Nashik : भुजबळ साहेबांच्या प्रयत्नाने दिंडोरीतील पर्यटन प्रकल्पामुळे मिळणार विकासाला चालना (Video)
अशोक खरात प्रकरणाला आर्थिक गैरव्यवहारांचे नवे वळण; शेकडो खात्यांतून कोट्यवधींची उलाढाल संशयाच्या भोवर्‍यात

सुरगाणा/ प्रतिनिधी

सरण ही थकले मरण पाहुनी. मरणानंतरही भोगाव्या लागतात नरक यातना.. या कवितेचा भावार्थ  प्रत्यक्ष  सुरगाणा तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायत मधील पिळूकपाडा येथे स्मशानभूमी अभावी भरपावसात एका मृतदेहाच्या अवहेलनेने स्पष्ट केला आहे.

पिळुपाडा येथे एका  वाहन चालकाचे आकस्मिक निधन झाले. त्याचवेळी सकाळ पासूनच  संततधार पावसामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी गावात अद्यापही स्मशानभूमी शेडच नसल्याने अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थांना सरण रचतांना चितेवर   चक्क ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला. कसे बसे सरण रचल्यानंतर संततधार पावसामुळे

चितेला अग्नी द्या याचा कशा अशा प्रश्न नागरिकांना पडला. 

कित्येकदा संततधार पावसामुळे मृतदेह अर्धेच जळतात. पुन्हा पाऊस उघडल्यावर लाकडे टाकावी लागतात. काही जागरूक ग्रामस्थांनी सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेली स्मशानभूमीत स्वच्छता,आसन व्यवस्था, प्रसाधन गृह,वृक्षारोपण, दिवे, पावसाचे साठवलेले पाणी अशा सुख सोयी  उपलब्ध केलेल्या आहेत. 

तालुक्यात आदिवासी अतिदुर्गम भागातील खेडोपाडी अजून ही स्मशानभूमी करीता प्रतिक्षा करावी लागतेय हे न उलगडणारे कोडे आहे. आदिवासी भागात दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र अनेक गावात स्मशानभूमी पर्यंत रस्ता नसल्याने चिखलातून वाट काढावी लागते, तर काही ठिकाणी नदीतून कमरे एवढ्या पाण्यातून मृतदेह वाहून घ्यावे लागतात. 

शेड नसल्याने उघड्यावर अंतिम संस्कार करण्यात येतात. अशा एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. माळेगावच्या ग्रामपंचायतीत ७ गावे समाविष्ट असून माळेगांव, भरडमाळ, केळुणे, सालभोये, पिळूकपाडा, पाथर्डी,पारचापाडा या एकाही गावात स्मशानभूमी शेड उभारले ले नाही. त्यामुळे विना स्मशानभूमी विरहीत एकमेव तालुक्यातील ग्रामपंचायत तर नाही ना असे म्हणण्याची वेळ आली आहे.

COMMENTS