शिवसेना-राष्ट्रवादीत वाद उफाळला… थेट न्यायालयात केली याचिका दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेना-राष्ट्रवादीत वाद उफाळला… थेट न्यायालयात केली याचिका दाखल

प्रतिनिधी : नाशिक काही दिवसांपूर्वी सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात बैठकीत जाहीर खडाजंगी झाली होती. कांदे यांनी आता भुजबळांविरोधात न्यायालय

Nashik : मुस्लिम जोडप्यांना महाआरतीचा मान
सामान्य माणूस जिंकला..बेरकी राजकारण हरले!
महसूल अधिकाऱ्यांनी देव मामलेदारांसारखे काम करावे -विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

प्रतिनिधी : नाशिक

काही दिवसांपूर्वी सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात बैठकीत जाहीर खडाजंगी झाली होती. कांदे यांनी आता भुजबळांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्याने 

या दोघांमधील वाद शिगेला पोहचला आहे. नाशिकात महाविकास आघाडीतील शिवसेना-राष्ट्रवादीमधला अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे.

महाविकास आघाडीतील(MVA) दोन नेत्यांमध्ये पुन्हा वाद उफाळला आहे. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande)यांनी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि नागरी अन्न पुरवठा मंत्री 

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांच्या विरोधात ‘नियोजन समितीचा निधी विकल्या’चा आरोप केला. या प्रकरणी कांदे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

याचिकेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांना देखील प्रतिवादी करण्यात आलं आहे. ‘भुजबळांनी निधी विकल्याचे पाचशे पुरावे माझ्याकडे आहेत’ असा दावा सुहास कांदे यांनी केला आहे.

COMMENTS