संयुक्त किसान कामगार मोर्चाच्या वतीने चक्काजाम आंदोलन

Homeबीड

संयुक्त किसान कामगार मोर्चाच्या वतीने चक्काजाम आंदोलन

केज तालुक्यात महागाई  कृषी कायदे आणि कामगार कायद्यासह इतर प्रश्नावर आज भारत देश बंद पुकारण्यात आला होता. त्या अनुषंगाने आज केज तालुक्यात संयुक्त

पोहणेर, तेलसमुख डिग्रसमध्ये वाळू माफियांचा तांडव; महसूल अन् पोलीस प्रशासन मुग गिळून गप्प!रात्रीचा खेळ अन् प्रशासनाचा डोळा!महसूल बुडाला, माफिया गब्बरप्रशासकीय यंत्रणेचे ’अर्थपूर्ण’ मौन?
तहसील बीड व एनडीआरएफ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आपदा मित्र-सखी’ प्रशिक्षण कार्यक्रम
विज्ञानामुळे अज्ञान आणि अंधश्रद्धा यावर विजय मिळवता येतो-डॉ.सुधिर येवले

केज तालुक्यात महागाई  कृषी कायदे आणि कामगार कायद्यासह इतर प्रश्नावर आज भारत देश बंद पुकारण्यात आला होता. त्या अनुषंगाने आज केज तालुक्यात संयुक्त किसान कामगार मोर्चाच्या वतीने लातूर औरंगाबाद हावेवर भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली एक तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड घोषणाबाजी करत नव्याने पारीत केलेले तीन कृषी कायदे कामगार कायद्यामध्ये बदल केलेला थांबवावा, देशात होत चाललेले खाजगीकरण थांबवावे,

नवीन विज बिल विधेयक रद्द करावे,अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले .  या मागणीचे निवेदन केज नायब  तहसीलदार यांना दिले असून पोलीस प्रशासनाने देखील चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी अनेक पक्षातील पदाधिकारी यांनी या चक्काजाम आंदोलनाला संबोधित केले . शेवटी निवेदनातील  मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी  बहुजन रयत परिषदचे रमेश तात्या गालफडे. केज संघर्ष समितीचे हनुमंत भोसले , काँग्रेस चे बाळासाहेब ठोंबरेयासह आदि कार्यकर्त्यांनी  सहभाग घेतला होता.

COMMENTS