शिवसेना नेत्यांच्या चौकशांना लागणार ब्रेक..? उद्धव ठाकरे-अमित शहांची होणार भेट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेना नेत्यांच्या चौकशांना लागणार ब्रेक..? उद्धव ठाकरे-अमित शहांची होणार भेट

प्रतिनिधी : दिल्ली नक्षलवादावर चर्चा करण्यासाठी राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात नक्सलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत गृहमंत्री अमित शहा यांच

धगधगती मशाल ठाकरे गटाचे नवे चिन्ह; पक्षाचे नाव ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’
शिवसेनेनं बेईमानी करत मुख्यमंत्रिपदाची भूमिका सांगितली आणि भाजपशी युती तोडली
पाठीत खंजीर खुपसणार्‍यांनी पूजा न करण्याची नैतिकता पाळावी

प्रतिनिधी : दिल्ली

नक्षलवादावर चर्चा करण्यासाठी राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात नक्सलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक सुरू आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) अनुपस्थितीत ही बैठक पार पडत असून विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित आहेत. 

दरम्यान, ही बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात बंद खोलीत चर्चा होणार असल्याची खात्रीशीर माहिती पुढे आली आहे. ही भेट राजकीय असण्याची दाट शक्यता असल्याने चर्चेला उधाण आले आहे.

आजच्या या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तेलगंणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, झारखंडचे मुख्यमंत्री, बंगालचे मुख्य सचिव आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीनंतर अमित शहांशी स्वतंत्रपणे भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या भेटीत महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थितीवर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांकडून शिवसेना नेत्यांच्या होत असलेल्या चौकश्या, कायदा आणि सुव्यवस्था या विषयांवरही चर्चेची शक्यता आहे. 

मात्र या सगळ्या विषयात राजकीय चर्चा महत्त्वाची ठरली जाणार आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले असले तरी, कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावर कुरबुरी सुरुच आहे. 

राष्ट्रवादीकडून शिवसेनेला सापत्नक वागणूक दिली जाते, अशी ओरड शिवसेनेचे नेते करताना दिसत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत धुसफूस वाढत असल्याचे चित्र आहे. 

तर दुसरीकडे भाजपचे नेते शिवसेना आमच्याबरोबर कधीही येऊ शकते, असा दावा करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे आणि अमित शहा यांच्यात कुठल्या मुद्द्यावर चर्चा होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

COMMENTS