धगधगती मशाल ठाकरे गटाचे नवे चिन्ह; पक्षाचे नाव ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धगधगती मशाल ठाकरे गटाचे नवे चिन्ह; पक्षाचे नाव ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’

नवी दिल्ली/प्रतिनिधी : अंधेरी पोटनिवडणूक तोंडावर आली असतांनाच शिवसेना आणि शिंदे गटात पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह यावरून वाद सुरु आहेत. अखेर सोमवारी उद्

निवडणूक झाल्यावर पुण्यात शिवसेनेचा विजयी मेळावा घेणार… संजय राऊत
उदय सामंतांवरील हल्ल्याने राजकीय वातावरण तापले
पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला मोठा झटका… नेत्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपात

नवी दिल्ली/प्रतिनिधी : अंधेरी पोटनिवडणूक तोंडावर आली असतांनाच शिवसेना आणि शिंदे गटात पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह यावरून वाद सुरु आहेत. अखेर सोमवारी उद्धव ठाकरे गटाला धगधगणारी मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे. तर त्यांच्या पक्षाचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे देण्यात आले आहे. त्रिशूळ व गदा ही दोन्ही चिन्हे बाद ठरवली आहेत. यासाठी आयोगाने ही चिन्हे धार्मिक प्रतीके असल्याचा दाखला दिला आहे.
निवडणूक आयोगाने ’धनुष्यबाण’ गोठवल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यात त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या संभाव्य निवडणूक चिन्हांची व पक्षाच्या नावाचीही माहिती दिली होती. ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे तीन चिन्हे दिली होती. यात एक त्रिशुळ, दुसरा उगवता सूर्य आणि तिसरा आहे धगधगती मशाल नावेही निवडणुूक आयोगाला दिली होती. परंतु त्यातील त्रिशूळ हे चिन्ह आयोगाने रद्दबातल ठरवले. तर शिंदे गटाचेही गदा हे चिन्ह रद्दबातल ठरवले आहे. दोन्ही चिन्हे धार्मिक असल्याचेही निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. शिवसेनेकडून शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव ठाकरे ही तीन नावे उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला दिली होती त्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव ठाकरे गटाला मिळाले पण शिंदे गटालाही बाळासाहेब शिवसेना हे नाव दिले गेले त्यामुळे या नावामुळे ठाकरे गट काय भूमिका घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे म्हणाले, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव योग्यच आहे. आम्ही काल हे नाव दिलेलेच होते. पण शिंदे गटाला मिळालेले नाव मिळाले किंवा इतर बाबींविषयी उद्या सुप्रीम कोर्टात हे प्रकरण जाईल तेव्हा त्यावर आक्षेप येईलच. मशाल या चिन्हावरही आम्ही यापुर्वी औरंगाबादेत लढलेलो आहोत.

COMMENTS