मोहीत कंबोज हाच आर्यनच्या अपहरणाचा सूत्रधार ; खंडणीसाठीच अपहरण केल्याचा नवाब मलिकांचा नवा आरोप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोहीत कंबोज हाच आर्यनच्या अपहरणाचा सूत्रधार ; खंडणीसाठीच अपहरण केल्याचा नवाब मलिकांचा नवा आरोप

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने शाहरूख खानचा मुलगा आर्यनला ड्रग्जप्रकरणात अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते आणि अल्पसंख्य

लातूर जिल्ह्याने महसूल उद्दीष्ट ओलांडले ; गौण खनिजमधून सर्वाधिक 103 टक्के वसूली
बुलडाण्यातील 4 गावांचा मध्यप्रदेशात जाण्याचा इशारा
सातासमुद्रापार जातीप्रथेवर बंदी !

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने शाहरूख खानचा मुलगा आर्यनला ड्रग्जप्रकरणात अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेविरोधांत आरोपांची मालिकाच सुरू केली असून, ही मालिका संपण्याचीच चिन्हे नाहीत. रविवारी मलिक यांनी पुन्हा एकदा माध्यमांना संबोधित करत, खंडणीसाठीच आर्यनचे अपहरण केल्याचा दावा केला. शिवाय या अपहरण नाट्याचे मास्टरमाईंड मोहीत कंबोज असल्याचा देखील दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
कंबोज यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप आहेत, त्यांनी 1100 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. ते पूर्वी काँग्रेसमध्ये आणि आता भाजपामध्ये गेलेल्या नेत्याच्या मागे फिरत होते. सरकार बदलल्याने त्यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला. दिंडोशीतून निवडणूक लढवली, मात्र पराभूत झाल्याने त्यानंतर त्यांना भाजप युवा मोर्चाचे पद देण्यात आले. दीड वर्षांपूर्वी त्यांच्या घरावर सीबीआयची धाड पडली होती. पण त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने चौकशीच बंद झाल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.
आर्यन खानला 2 ऑक्टोबरच्या दिवशी क्रूजवर बोलावण्यात आले होते, असे नवाब मलिक म्हणाले आहेत. प्रतीक गाबा आणि आमिर फर्निचरवाला यांच्या माध्यमातून आर्यन खान क्रूजवर गेला. मोहीत कंबोज यांच्या साल्याच्या माध्यमातून हे जाळे टाकण्यात आले. तिथे आर्यन खानला पोहोचवले गेले. आर्यन खानचे अपहरण करून 25 कोटींची खंडणी मागण्याचा खेळ सुरू झाला. याची डील 18 कोटींमध्ये झाली. 50 लाख रुपये उचलले देखील गेले होते. पण एका सेल्फीने खेळ बिघडवला, असे नवाब मलिक म्हणाले आहे. मोहित कंबोज यांनीही मलिकांना जोरदार प्रत्युत्तर दिले असून, या प्रकरणात काँग्रेसच्या मंत्र्याचे नाव घेतल्याबाबत त्यांचे आभार मानले आहेत. तसेच ड्रग्स पेडलर्सबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मुलांच्या असलेल्या संबधांबाबत खुलासा करण्याचे आव्हानही कंबोज यांनी मलिक यांना दिले आहे. तसेच या प्रकरणात मी मास्टरमाईंड असल्याचे नवाब मलिक म्हणताहेत, मग ते गेल्या एका महिन्यापासून झोपले होते काय? असा प्रश्‍न मोहित कंबोज यांनी विचारला आहे.

मोहीत कंबोज आणि समीर वानखेडे मित्र
भाजपचे नेते मोहीत कंबोज आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे मित्र असल्याचा देखील दावा नवाब मलिक यांनी केला. अपहरणाचे मास्टरमाईंड मोहीत कंबोज आहे. खंडणीच्या खेळात मोहीत कंबोज वानखेडेचे सहकारी आहेत. मोहीत कंबोज आणि वानखेडेचे चांगले संबंध आहेत. स्मशानभूमीत आपला कुणीतरी पाठिंबा करते असा दावा वानखेडेंनी केला. 7 तारखेला मोहीत कंबोज आणि वानखेडे स्मशानभूमीच्या बाहेर भेटले. तिथल्या रहिवाशांनी सांगितले की एक गाडी आली, त्यात बॉडिगार्ड होते. एक दाढीवाला त्यांना भेटला, असा दावा नवाब मलिक यांनी केला.

पुरावे असतील तर मलिकांनी कोर्टात जावे : एनसीबी
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी आजही असेच आरोप करत समीर वानखेडे आणि मोहित कंबोज यांच्याबद्दल काही प्रश्‍न उपस्थित केले आहेत. त्यावर आता एनसीबीकने देखील नवाब मलिकांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. मलिक यांच्याकडे जर पुरावे असेल तर त्यांनी ते कोर्टात सादर करावे असे आवाहन केले आहे. तसेच एनसीबीकडून असेही सांगण्यात आले की, वानखेडे आणि सॅम डिसोझा यांच्यात संपर्क नव्हता.

COMMENTS