पाकिस्तानचा भारतीय नौकेवर गोळीबार ; मच्छीमाराचा मृत्यू

Homeताज्या बातम्या

पाकिस्तानचा भारतीय नौकेवर गोळीबार ; मच्छीमाराचा मृत्यू

मुंबई : जम्मू-काश्मीर खोर्‍यात दहशतवाद्यांच्या कारवाया सुरूच असतांना, आता गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील सागरी सीमेवर मासेमारी करणार्‍या भारतीय नौकेव

हायवेवर पक्षाला वाचवण्यासाठी थांबले अन् टॅक्सीन थेट उडवूनच लावलं | LOK News 24
अभिनेत्री सना खान बनली आई, दिला मुलाला जन्म
मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधनमानसिक आरोग्य जनजागृतीचा संवेदनशील आवाज हरपला

मुंबई : जम्मू-काश्मीर खोर्‍यात दहशतवाद्यांच्या कारवाया सुरूच असतांना, आता गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील सागरी सीमेवर मासेमारी करणार्‍या भारतीय नौकेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील एका माच्छीमाराचा मृत्यू झाला आहे. तर, गुजरातमधील एका मच्छीमाराला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळं मच्छीमारांमध्ये चिंतेचं व संतापाचे वातावरण आहे. गुजरात राज्याच्या ओखा बंदरातील ’जलपरी’ ही नौका शनिवारी मासेमारी करण्यास समुद्रात गेली होती. ही मासेमारी नौका गुजरात राज्यातील ओखा इथं मासेमारी करत असताना पाकिस्तानी सागरी सुरक्षा रक्षकांनी पहाटेच्या सुमारास भारतीय हद्दीत शिरकाव करून मासेमारी नौकेवर बेछूट गोळीबार केला. त्यात पालघर जिल्ह्यातील वडराई गावातील तरुण मच्छिमार श्रीधर रमेश चामरे (वय 30) यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मच्छीमारांमध्ये संताप आहे. महाराष्ट्र व गुजरात सरकारनं तातडीनं पावलं उचलून केंद्र सरकारच्या मदतीनं श्रीधर रमेश चामरे यांचा मृतदेह सन्मानपूर्वक आणावा व पाकिस्तानी सैनिकांच्या अमानवी कृत्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर चौकशी केली जावी, अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे. या प्रकरणी ओखा येथील मरीन पोलिस स्थानकांमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून सदर घटनेची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती नौकेचे मालक जयन्ताभाई बोखामा यांनी दिली.

COMMENTS