माजी आमदार चौधरी यांना त्वरित अटक करावी-

Homeमहाराष्ट्र

माजी आमदार चौधरी यांना त्वरित अटक करावी-

भुसावळ येथील माजी आमदार  संतोष चौधरी यांना त्वरित अटक करावी अशा आशयाचे निवेदन कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना कोपरगाव नगरपालिका कर्मचारी संघटनेच्यावतीने देण्यात आले .

मनपा पतसंस्था व झेडपी सोसायटी निवडणुकीत जोरदार शक्तीप्रदर्शन
खुल्या दफनभूमी मध्ये केला कोरोना बाधित व्यक्तीचा मृतदेह दफन | ‘आपलं नगर’ | LokNews24
आमदार संग्राम जगताप अडचणीत… फसवणुकीचा गुन्हा होणार दाखल

कोपरगाव शहर प्रतिनिधी- भुसावळ येथील माजी आमदार  संतोष चौधरी यांना त्वरित अटक करावी अशा आशयाचे निवेदन कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना कोपरगाव नगरपालिका कर्मचारी संघटनेच्यावतीने देण्यात आले .

सविस्तर वृत्त असे की दि १४ जून २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार अवैध कामाची पाहणी करण्यासाठी भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी व इतर अधिकारी कर्मचारी गेले असताना भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी  संदीप चिद्रवार व इतर अधिकारी यांना माजी आमदार संतोष चौधरी यांनी अश्लील व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व दमदाटी करून अंगावर धावून जात शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या घटनेचा कोपरगांव नगरपरिषदेमध्ये कार्यरत महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी यांचेकडून आज निषेध करण्यात आला. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना या घटनेचा  निवेदन देऊन निषेध करण्यात आला या निवेदनात माजी आमदार संतोष चौधरी यांना त्वरित अटक करून यापुढे अशा घटना घडणार नाहीत यासाठी शासनाने ठोस पावले उचलावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या वतीने यांनी निवेदनाद्वारे केली.
 यावेळी नाशिक विभाग व अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीचे   तसेच  कोपरगांव नगरपरिषद कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

COMMENTS