माऊलीच्या मदतीने तिला मिळतंय आयुष्याचं दान…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माऊलीच्या मदतीने तिला मिळतंय आयुष्याचं दान…

अहमदनगर/प्रतिनिधी-मनोविकलांग महिला व त्यांच्या मुलांचा आधारस्तंभ असलेल्या नगरच्या माऊली सेवा प्रतिष्ठानमधील एका महिलेवर कॅन्सरचे उपचार हळूहळू यशस्वी

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या फुले 10001 ऊस वाणास राष्ट्रीय पातळीवर मान्यता
अश्‍लील चित्रपटांची निर्मिती करून अ‍ॅप्सवर प्रदर्शित करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश l DAINIK LOKMNTHAN
कृषी विकास अधिकारी शंकर किरवे यांच्या संपत्तीची चौकशी करून कारवाई करा

अहमदनगर/प्रतिनिधी-मनोविकलांग महिला व त्यांच्या मुलांचा आधारस्तंभ असलेल्या नगरच्या माऊली सेवा प्रतिष्ठानमधील एका महिलेवर कॅन्सरचे उपचार हळूहळू यशस्वी होत आहेत. येथील कर्करोग तज्ज्ञ डॉ. सतीश सोनवणे व त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी मोफत उपचार तिच्यावर केले असून, त्यांना तिनेही प्रतिसाद दिल्याने शेवटच्या स्टेजच्या कॅन्सरमधून ती आश्यर्यकारकपणे सावरते आहे. एकाअर्थाने तिला नवीन आयुष्याचे दान मिळाले आहे.
नगर-मनमाड महामार्गावरील शिंगवे नाईक या नगरपासून 16 किलोमीटर अंतरावरील नगर तालुक्यातीलच गावात माऊली सेवा प्रतिष्ठानचा मनगाव प्रकल्प आहे. या प्रकल्पात 360 महिला व त्यांच्या 30 मुलांचा सांभाळ केला जातो. डॉ. सुचेता व डॉ. राजेंद्र धामणे या दाम्पत्याने सुमारे 20 वर्षांपूर्वी या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली होती. मनोविकलांग महिलांना या प्रकल्पात आणून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार व त्यांचे मानसिक समुपदेशन येथे केले जाते. त्यामुळे अनेक महिला मनोविकलांगतेतून बर्‍या झाल्या आहेत व त्यांनी येथेच उदबत्ती बनवणे वा डिझाईनर बांगड्या आणि अन्य साहित्य बनवण्याचे काम करून स्वावलंबी होण्याचा मार्ग स्वीकारला आहे. याच प्रकल्पातील एका ज्येष्ठ महिलेवर नुकतेच कॅन्सर उपचार यशस्वी झाले आहेत.
या महिलेबाबत व तिच्यावरील उपचारांबाबत माहिती देताना डॉ. धामणे यांनी सांगितले की, ही महिला दूर कुठल्या तरी गावखेड्यातील आहे. तिची आई लहानपणीच आजाराने ग्रासलेली असल्याने तिचे करता करता त्यावेळचं हिचं लहानपण नकळत संपलं. नंतर आई त्याच जीवघेण्या आजारात संपून गेली तर बाप ते दुःख विसरायला आणि काहीच करायला नको म्हणून दारू पित पित संपून गेला. हीचे बालपण हरवलंच, पण मग वयही वाढत गेलं. आई-बाप वारल्यावर भाऊ बायकोला घेऊन परागंदा झाला. तोपर्यंत हिच्या लग्नाचंही वय उलटत गेलं. त्यामुळे कुठं कुठं वावरा-शिवारात रोजाराजी करता करता आणि एकटेपणाचं दुःख पचवता पचवता ती जगू लागली. शेतशिवारातल्या कष्टानं रापून गेली आणि हळूहळू या सगळ्या मानसिक धक्यातून सावरताना तिच्या त्या उदास जगण्याचं शारीरिक आजारात कधी रूपांतर झालं, हे तिला कळलंच नाही. छाती दगडासारखी झाली. त्यात तिथे जखम झाली. भयंकर वेदना होत होत्या. आसपासच्या वाडी वस्तीवरील माणसं तिला खाऊ पिऊ घालत होती, पण ती तरी कुठवर पुरवणार? गोरगरीबांच्या योजना कल्याणकारी देशात खूप आहेत, पण त्या कागदावर ..व मोठ्या मोठ्यांच्या तोंडी लावण्यापुरत्या .., असे सांगून डॉ. धामणे म्हणाले, काही सहृदयी कार्यकर्त्यांनी तिला माऊली संस्थेच्या घरात पोचवलं आणि अशा गंभीर प्रसंगी नेहमी माऊलीतील महिलांना मदत करणार्‍या अहमदनगरच्या डॉ.सतीश सोनवणे, डॉ. प्रशांत पठारे आणि मॅककेअर हॉस्पिटलच्या टीमने तिच्या उपचाराची जबाबदारी उचलली. तिला कॅन्सर झाला असून, तो अगदी शेवटच्या स्टेजचा आहे. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यानंतर केमोथेरपीच्या आतापर्यंत सहा सायकल झाल्या. सर्जरी आणि पूर्ण औषधोपचार करण्याची जबाबदारी डॉ. सोनावणे आणि मॅककेअर परिवाराने घेतली व तीही अगदी पूर्णपणे मोफत. औषध आणि सगळ्या तपासण्या उपचार आणि सर्जरी सहित. अर्थात ही अशी मदत करण्याची त्यांची पहिली वेळ नाही. यापूर्वी अनेकदा माऊलीच्या माय भगिनींचे विविध ऑपरेशन आणि उपचार त्यांनी असेच पूर्ण मोफत केले आहेत, असेही डॉ. धामणेंनी स्पष्ट केले. शेवटच्या स्टेजच्या कॅन्सरमधून ही महिला आश्यर्यकारकपणे सावरते आहे. एकार्थाने तिला नवीन आयुष्याचे दान मिळाले आहे, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.

र्वांची मदत मिळतेय
माऊली संस्थेच्या कार्यात अहमदनगरमधील नामवंत डॉक्टर आणि रुग्णालये सहभागी होत असून, यानिमित्ताने हा सकारात्मक विचार रुजतो आहे. ज्यांना या जगात स्वतःचे म्हणून कुणी नाही, त्या मायबहिणींना आणि त्यांच्या लेकरांना जगवण्याचा आणि आत्मनिर्भर करण्याचा हा प्रयत्न सर्वांच्या मदतीने सार्थकी लागतो आहे, अशी भावनाही डॉ. धामणे यांनी व्यक्त केली.

COMMENTS