नाशिक – सणोत्सवांच्या अनुषंगाने लसीकरण वाढविण्यासाठी नियोजन करावे – पालकमंत्री

Homeताज्या बातम्या

नाशिक – सणोत्सवांच्या अनुषंगाने लसीकरण वाढविण्यासाठी नियोजन करावे – पालकमंत्री

नाशिक : ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी करण्यासाठी तसेच सणोत्सवांच्या अनुषंगाने लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे, अशा सूचना पाल

ठाकरे सरकारच्या मंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम (Video)
छगन भुजबळांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
डावखरे कुटुंबात राजकीय फूट; प्रबोध डावखरे राष्ट्रवादीत

नाशिक : ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी करण्यासाठी तसेच सणोत्सवांच्या अनुषंगाने लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. आज येवला विश्रामगृह येथे निफाड व येवला तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती आयोजित आढावा बैठकीत भुजबळ बोलत होते.

यावेळी पालकमंत्री म्हणाले, ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी मालेगावच्या धर्तीवर धर्मगुरू यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. रुग्णसंख्या कमी करण्याकरीता त्रिसूत्रीच्या वापरासोबतच लसीकरण महत्त्वाचे आहे. शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचनाही भुजबळ यांनी दिल्या आहेत.

तालुक्यात सुरू करण्यात आलेला ऑक्सिजन प्रकल्प सुरळीतपणे सुरू राहणे आवश्यक आहे. त्यासाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कंपनीसोबत समन्वय साधून प्रकल्पाचा वीज पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी नियोजन करावे, असेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

अतिवृष्टीबाधित क्षेत्राचे पंचनामे वेळेत पूर्ण करावेत

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे वेळेत पूर्ण करण्यात येऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी अहवाल सादर करण्यात यावा, असेही भुजबळ यांनी अतिवृष्टीबाधित परिस्थितीचा आढावा घेतांना सांगितले. यासोबतच वीज वितरण कंपनीच्या वीज देयकांच्या थकबाकी व वसूलीबाबत देखील माहिती घेतली.

COMMENTS