देशात ‘हिंदू खतरेमें’ नाही… खुद्द मोदी सरकारचंच स्पष्टीकरण

Homeदेश

देशात ‘हिंदू खतरेमें’ नाही… खुद्द मोदी सरकारचंच स्पष्टीकरण

प्रतिनिधी : दिल्ली  काही दिवसांपूर्वी नागपूरमधील माहिती अधिकार कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे (Mohnish Jabalpure) यांनी महिती अधिकारा कायद्याअंतर्ग

सक्ती नाही, पण मास्क वापरा : राज्य सरकारचं आवाहन | DAINIK LOKMNTHAN
धक्कादायक… एकाच कुटुंबातील तिघांनी केली आत्महत्या… कारण…
मंत्री झिरवाळांचा खासगी सचिव कार्यमुक्त

प्रतिनिधी : दिल्ली 

काही दिवसांपूर्वी नागपूरमधील माहिती अधिकार कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे (Mohnish Jabalpure) यांनी महिती अधिकारा कायद्याअंतर्गत गृहमंत्रालयाकडे (Home Ministry) एक विचारणा केली होती. 

देशातील हिंदू धर्माला कोणत्या प्रकारचा धोका आहे का? असल्यास त्याच्या पुराव्यांची जबलपुरे यांनी मागणी केली होती. गृहमंत्रालयाकडे तो पुरावा आहे, असा त्यांनी दावा केला होता.

गृहमंत्रालयाचे अधिकारी व्ही. एस. राणा यांनी या कथित धोक्याचे दावे फेटाळले आहेत. जबलपुरेंच्या मागणीला प्रत्युत्तर देत राणा यांनी हिंदू धर्माला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

हिंदू धर्म धोक्यात असल्याची भीती काल्पनिक आहे. अशा शक्यतांना दुजोरा देणारी कोणतीही नोंद आपल्याकडे नसल्याचेही गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आले.

COMMENTS