तहसीलदार देवरेंनी केला सहा कोटीचा भ्रष्टाचार?; लोकायुक्तांकडे तक्रार दाखल, सुनावणीकडे लक्ष

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तहसीलदार देवरेंनी केला सहा कोटीचा भ्रष्टाचार?; लोकायुक्तांकडे तक्रार दाखल, सुनावणीकडे लक्ष

अहमदनगर/प्रतिनिधी-पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे व पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यातील संघर्ष आता टोकाला जाण्याच्या स्थितीत आहे. पार

विखे-जगतापांना फाईट देणार आता लंके – काळे; एकमेकांना ताकद दिली जाणार, नगर दक्षिणेच्या राजकारणात येणार रंगत
एकतर देवरेंची बदली करा, किंवा आमची तरी करा…; पारनेरच्या महसूल कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन
अण्णांनाही नकोत पारनेरला देवरे; लंके यांनी भेटून दिला सहा पानी अहवाल

अहमदनगर/प्रतिनिधी-पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे व पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यातील संघर्ष आता टोकाला जाण्याच्या स्थितीत आहे. पारनेरमधून त्यांच्याविरोधात राज्याच्या लोकायुक्तांकडे भ्रष्टाचाराची पहिली तक्रार दाखल झाली आहे. या तक्रारीनुसार देवरेंनी पारनेर तालुक्यात सुमारे 6 कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे आता देवरे-लंके प्रकरण राज्यात आणखी गाजण्याची चिन्हे आहेत.
पारनेर येथील तहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरुध्द राहुल झावरे, संदीप चौधरी, ज्ञानेश्‍वर लंके व सुहास सालके या अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी थेट महाराष्ट्र लोकायुक्त यांच्या समक्ष भ्रष्टाचाराचे आरोप करणारी याचिका दाखल केलेली आहे. काही दिवसांपूर्वी स्वतःची एक ध्वनिफीत (ऑडिओ क्लिप) व्हायरल करून कामाच्या ठिकाणी येणारे दबाव सहन होत नसल्याने आत्महत्या करण्याचे विचार येतात असे जाहीर केल्याने तहसीलदार देवरे महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाल्या होत्या. पण, स्वतः केलेला भ्रष्टाचार लपविण्यासाठी व सहानुभूती निर्माण करण्याच्या उद्देशाने देवरे यांनी या ध्वनिफितीचा (ऑडिओ क्लिप) अत्यंत चलाखपणे वापर केला असा आरोप तक्रारदार राहुल झावरे पाटील यांनी केला आहे. स्वतःच्या लोकसेवक पदाचा (पब्लिक सर्व्हंटस) गैरवापर करून व्यक्तिगत हितासाठी, भ्रष्ट हेतूने अनेक पातळ्यांवर भ्रष्टाचार करणे, वाळूमाफियांना परस्पर कारवाईमुक्त करणे, बेकायदेशीर वाळू उपसा करणार्‍यांचे ट्रॅक्टर, डम्पर, जे.सी.बी. मशीन्स व पोकलेन अशी वाहने कोणतेही तडजोड शुल्क सरकारला जमा न करता परस्पर मुक्त करणे अशा अनेक प्रकरणात देवरे यांनी तब्बल 5,94,96,072 /- कोटी रुपयांच्यावर घोटाळा केला आहे, असा आरोप लोकायुक्तांकडे केलेल्या तक्रारीतून झावरे, चौधरी, लंके व सालके यांनी केला आहे. ही तक्रार याचिका अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. अजित देशपांडे व अ‍ॅड. अक्षय देसाई यांच्या मदतीने लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कार्यालय (मुंबई) यांच्याकडे दि. 30/08/2021 रोजी ऑनलाइन पद्धतीने दाखल करण्यात आली. देवरे यांनी भ्रष्टाचार केल्याचे पुरावे याचिकेसोबत दाखल करताना तक्रारदारांनी दिनांक 06/08/2021 रोजी संयुक्त चौकशी समितीत विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे दाखल झालेल्या अहवालाचा आधार घेतला आहे.

COMMENTS