Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कवठेत ड्रोनव्दारे औषध फवारणी ; ग्रामीण शेतकर्‍यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

मसूर / वार्ताहर : जय जवान, जय किसान यानंतर आता ’जय विज्ञान’ या घोष वाक्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग आधुनिकतेची कास धरत शेतकरी बांधवांच

राज्यात थंडीचा जोर वाढला
पुणे प्रादेशिक विभागात कृषिपंप ग्राहकांकडे 12 हजार कोटीचे थकले वीजबिल
सांगली बँकेस 18 जागांसाठी 85.31 टक्के मतदान

मसूर / वार्ताहर : जय जवान, जय किसान यानंतर आता ’जय विज्ञान’ या घोष वाक्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग आधुनिकतेची कास धरत शेतकरी बांधवांच्या शेतात नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. या उपक्रमांतर्गत आज नवीन कवठे, ता. कराड येथे प्रकाश लक्ष्मण साळुंखे यांच्या शेतावर बीबीएफ पेरणी यंत्राने पेरणी केलेल्या हरभरा या पिकाच्या प्लॉटवरती ड्रोनव्दारे औषध फवारणीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.
कवठे येथील साळुंखे यांचा एक हेक्टर हरभरा पिकाचा प्लॉट सध्या फुलोरा व घाटे भरण्याच्या अवस्थेत असल्यामुळे अन्नद्रव्ये व औषध फवारणी मजुराने करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे या अडचणीवर उपाय म्हणून स्वयंचलित ड्रोनद्वारे फवारणी करण्यात आली. बॅटरीवर चालणारे हे ड्रोन असून यामध्ये अत्याधुनिक जीपीएसप्रणाली आहे. त्यामुळे एकवेळ प्लॉटच्या सीमा निश्‍चित करून क्षेत्र मोजमाप केल्यास पुन्हा मोजण्याची आवश्यकता भासत नाही. औषधांची मात्रा निश्‍चित करता येते. औषध अथवा बॅटरी मध्येच संपले तर पुन्हा त्याच ठिकाणाहून फवारणी सुरु होते.
याप्रसंगी कराडचे तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला यांनी स्वयंचलित ड्रोन फवारणीमुळे 6 मिनिटात 1 एकर फवारणी, सरासरी प्रति एकरी 700 रू. ड्रोन भाडे, औषध, वेळ व पैसा यांची बचत, पिकांच्या वाढीच्या सर्व अवस्थेत फवारणी शक्य होते. तसेच विषारी औषधांचा शेतकर्‍यांशी संपर्क होत नाही, असे फायदे व महत्त्व सांगितले. तसेच केंद्र शासनाने कृषी यांत्रिकरण उप-अभियान या योजनेअंतर्गत ड्रोन खरेदीसाठी शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था तसेच वैयक्तिक लाभार्थ्यांना अनुदान उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे नवीन ड्रोन सेवा पुरवठादारांनी एका छत्राखाली सर्व सुविधा शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. ड्रोन सेवा पुरवठादार प्रथमेश पाटील यांनी शेतकरी बांधवांना ड्रोन फवारणीचे तंत्रज्ञान सांगून शेतकर्‍यांच्या शंकांचे समाधान केले.
यावेळी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक लालासाहेब पाटील, कराडचे तालुका कृषि अधिकारी रियाज मुल्ला, उंब्रजचे मंडल कृषि अधिकारी रवि सुरवसे, कृषि पर्यवेक्षक के. एम. वाघमोडे, कृषि सहाय्यक सतिश रणपिसे, पृथ्वीराज येटणे, संजय जाधव, श्रीमती सी. एस. चौधरी, कृषि सेवक श्रीमती प्रतिक्षा लिपारे, नरेंद्र सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मौजे कवठे, खराडे, कालगाव, चिखली, खालकरवाडी, भुयाचीवाडी, शिरगाव व उंब्रज परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते. प्रात्यक्षिक आयोजनासाठी उंब्रजचे मंडळ कृषि अधिकारी रवि सुरवसे व खराडे सजाचे कृषि सहाय्यक सतिश रणपिसे यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS