अण्णांनाही नकोत पारनेरला देवरे; लंके यांनी भेटून दिला सहा पानी अहवाल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अण्णांनाही नकोत पारनेरला देवरे; लंके यांनी भेटून दिला सहा पानी अहवाल

पारनेर/प्रतिनिधी-ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पारनेर तालुक्यातील आ. लंके व तहसीलदार देवरे यांच्या प्रकरणात उडी घेताना, पारनेर तालुक्यात देवरे न

जोपर्यंत बाई जीव देत नाही तोपर्यंत तिच्या म्हणण्याला राज्यात किंमत नाही-चित्रा वाघ I l LOK News 24
आ. लंकेंची लिपिकास मारहाण..पण त्याचे घुमजाव…
पारनेरच्या महिला तहसीलदारांचा आत्महत्येचा इशारा; आमदार निलेश लंकेकडे रोख

पारनेर/प्रतिनिधी-ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पारनेर तालुक्यातील आ. लंके व तहसीलदार देवरे यांच्या प्रकरणात उडी घेताना, पारनेर तालुक्यात देवरे नकोत, अशी जाहीर भूमिका घेतली आहे. आमदार निलेश लंके यांनी शनिवारी अण्णा हजारेंना भेटून त्यांच्यासमोर तहसीलदार देवरेंच्या भ्रष्टाचाराची कुंडली मांडली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसलेंचा 6 पानी अहवालच त्यांना दाखविला. त्यानंतर याबाबत बोलताना हजारे म्हणाले, अशा गोष्टींमुळे तालुक्याची बदनामी होत आहे. त्यामुळे असे अधिकारी तालुक्याला नको आहेत. वेळ पडली तरी मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची सुसाईड नोट ऑडिओ क्लिपने शुक्रवारी नगर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात खळबळ उडवली आहे. या क्लिपमध्ये त्यांनी पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार लंके यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. या पार्श्‍वभूमीवर आ. लंके यांनी ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांची भेट घेतली व जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी तहसीलदार देवरे यांच्याविरोधात 6 पानी अहवालच नाशिक विभागीय आयुक्तांकडे पाठविलेला असल्याचे सांगतदाना देवरे यांच्या भ्रष्टाचाराची माहिती हजारेंना दिली. जवळपास 1 तास आमदार लंके व हजारे यांच्यामध्ये चर्चा झाली असून भ्रष्टाचाराचे पुरावे इतर अनेक विषयांवर पण यावेळी चर्चा झाली. पारनेरच्या तहसीलदार देवरे यांची ऑडिओ क्लिप शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे तालुक्यासह राज्यात सर्वत्र एकच खळबख उडाली. त्यात पारनेरचे आमदार लंके व महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांवर आरोप करण्यात आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आमदार लंके यांनी शनिवारी हजारे यांची भेट घेतली. तहसीलदार देवरे यांनी तालुक्यात काम
करत असताना सामान्य जनतेची पिळवणूक करत कसा भ्रष्टाचार केला, याचीही माहिती लंके यांनी हजारे यांना दिली. तसेच इतर जिल्ह्यांमध्ये तहसीलदार म्हणून काम करताना त्यांचे काम कसे होते, याबाबतचीही माहिती हजारे यांना दिली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, माजी सरपंच जयसिंग मापारी, निलेश लंके प्रतिष्ठानचे कारभारी पोटघन, दत्ता आवारी आदी उपस्थित होते.

वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांशी बोलेन : हजारे
तहसीलदार देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर व त्यासंबंधीच्या बातम्या टीव्हीवर पाहिल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्याशी बोललो आहे. अशा गोष्टींमुळे तालुक्याची बदनामी होत आहे. त्यामुळे असे अधिकारी तालुक्याला नको आहेत. वेळ पडली तर मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करील, असेही हजारे यावेळी म्हणाले.

COMMENTS