डेल्टाचे जिल्ह्यात आढळले चार रुग्ण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डेल्टाचे जिल्ह्यात आढळले चार रुग्ण

अहमदनगर/प्रतिनिधी- जगामध्ये धूमाकुळ घातलेल्या कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे चार रुग्ण नगर जिल्ह्यात आढळले आहेत. जिल्ह्यातून कोरोनाची दुसरी लाट ज

रात्री 9 पर्यंत ऑर्डर घ्या… फक्त जेवण्याच्यावेळीच मास्क काढू द्या; हॉटेल व बार मालकांना सक्त सूचना, कर्मचार्‍यांचे लसीकरण बंधनकारक
ढवळपुरीत ‘रेकॉर्ड ब्रेक’ लसीकरण, एकाच दिवसात तब्बल अकराशे नागरिकांनी घेतली लस.
पोलिसांचा आणखी एक दणका…कर्जतच्या टोळीवरही मोक्का

अहमदनगर/प्रतिनिधी- जगामध्ये धूमाकुळ घातलेल्या कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे चार रुग्ण नगर जिल्ह्यात आढळले आहेत. जिल्ह्यातून कोरोनाची दुसरी लाट जवळपास संपण्याच्या मार्गावर असताना आता नव्याने डेल्टाचे चार रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट आली व आता तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. पण दुसरी लाट ओसरताना देशात कोरोनाच्याच डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळून येत असल्याने भीतीदायक वातावरण आहे. आतापर्यंत असे रुग्ण नगर जिल्ह्यात आढळले नव्हते. पण आता चारजण सापडले असल्याने खळबळ उडाली आहे. या डेल्टा प्लस रुग्णांमध्ये पारनेर शहर आणि कळस गावात तसेच श्रीगोंदा शहरात आणि पाथर्डी तालुक्यातील मंगरूळ गावात चार रुग्ण आहेत. विशेष म्हणजे हे सर्व रुग्ण बरे झालेले आहेत. तरीही आरोग्य विभागाद्वारे या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.

नव्याने सापडले 712

जिल्ह्यात करोनाचे मंगळवारी नव्याने 712 रुग्ण सापडले आहेत. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक 235 करोना बाधित आढळले आहेत. त्याखालोखाल अकोले तालुक्यात 102 रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी आढळलेल्या करोनाच्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी- श्रीगोंदा 74, पारनेर 73, कर्जत 45, राहाता 43, नेवासा 35, नगर तालुका 21, राहुरी 16, नगर शहर 14, इतर जिल्हा 12, जामखेड 10, पाथर्डी 9, श्रीरामपूर 9, कोपरगाव 7, शेवगाव 7. मंगळवारी 556 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्याचे प्रमाण 96.47 टक्के आहे. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 6 हजार 688 इतकी झाली आहे. जिल्हयाच्या रुग्ण संख्येत 712 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 4 हजार 752 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 123, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 246 आणि अँटीजेन चाचणीत 343 रुग्ण बाधीत आढळले. जिल्ह्याची आतापर्यंतची बरे झालेली रुग्ण संख्या : 3,06,688. उपचार सुरू असलेले रुग्ण : 4,752. पोर्टलवरील मृत्यू नोंद : 6,469. एकूण रुग्ण संख्या : 3,17,909.

COMMENTS