केंद्रीय मंत्री राणेंच्या फोटोवर जोड्यांचा प्रहार…;शहर शिवसेनेचे आंदोलन, गुन्हाही केला दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्रीय मंत्री राणेंच्या फोटोवर जोड्यांचा प्रहार…;शहर शिवसेनेचे आंदोलन, गुन्हाही केला दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी- केंद्रीय लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या फोटोवर नगरच्या शिवसेनेच्या महापौर रोहिणी शेंडगेंसह महिला आघाडीच्या स्मिता अष्टेकर व

पिपल्स रिपब्लिकन पार्टीचा प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या उपस्थितीत 15 रोजी जिल्हा मेळावा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची आ. रोहित पवारांनी घेतली भेट
Ahmednagar : कोठला व हवेली परिसरात सवार्यांचे दर्शन पूर्णपणे बंद l Lok News24

अहमदनगर/प्रतिनिधी- केंद्रीय लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या फोटोवर नगरच्या शिवसेनेच्या महापौर रोहिणी शेंडगेंसह महिला आघाडीच्या स्मिता अष्टेकर व अन्य पदाधिकार्‍यांनी मंगळवारी जोड्यांचा प्रहार केला. राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध यातून करण्यात आला व त्यानंतर राणेंच्या फोटोचे दहनही केले गेले. दरम्यान, शिवसेनेने राणेंविरोधात येथील कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे केंद्रीय मंत्री राणे यांचा राज्यभरातील शिवसेनेकडून मंगळवारी सर्वत्र निषेध केला गेला. नगर शहर कोतवाली पोलिस ठाण्यामध्येही शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी दिलेल्या तक्रारीनंतर राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी नगरच्या गांधी मैदानातील भाजप कार्यालयासमोर येऊन जोरदार घोषणाबाजी करीत राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून त्या प्रतिमेचे दहन केले. नारायण राणेचं करायचं काय…खाली डोकं वर पाय, कोंबडी चोर नारायण राणे अशा जोरदार घोषणाबाजी करीत शिवसैनिकांनी या घटनेचा निषेध केला. भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेमध्ये केंद्रीय लघुउद्योग खात्याचे मंत्री राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे सर्वत्र त्या वक्तव्याचा निषेध सुरू आहे. अनेक ठिकाणी राणेंच्या निषेधाचे फलक सुद्धा लावण्यात आलेले आहे तसेच राणे यांच्यावर राज्यभरात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर राणे यांच्या विरोधामध्ये नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते व नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. यावेळी राणे यांच्याविरोधात शिवसैनिकांनी कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारामध्येही जोरदार घोषणाबाजी केली. राणेंवर तात्काळ गुन्हा दाखल करा, अशी मागणी यावेळी करीत घोषणाबाजी केली.

त्यांना नगरला पाऊल ठेवू देणार नाही
या आंदोलनाच्यावेळी बोलताना शिवसेनेचे माजी महापौर भगवान फुलसौंदर म्हणाले की, केंद्रीय मंत्र्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे अतिशय निंदनीय आहे. राणे यांना शिवसेनेने मोठे केले. आज ते सर्व काही विसरले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द त्यांनी वापरले असून, शिवसेना असे वक्तव्य कधीही सहन करणार नाही. त्यांना नगरला आम्ही पाऊल ठेवू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. भाजपने राणे यांना पक्षात घेऊन मोठी चूक केली आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

COMMENTS