जिल्हा कर्जवितरण मेळाव्यात 117 कोटी 50 लाखांचे वितरण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा कर्जवितरण मेळाव्यात 117 कोटी 50 लाखांचे वितरण

नगर-  कोरोनामुळे प्रत्येक क्षेत्रावर विपरित परिणाम झाला आहे. आर्थिक संकटाच्या विवंचनेत अनेकजण आहेत. त्यांना उभारी देण्यासाठी सरकार व बँकेने पाऊल उ

क्रांतीवीर राघोजी भांगरेंचा स्मृतीस्तंभ उभारणार : निरंजन डावखरे
सहा देवस्थानच्या 3 कोटीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी
जामखेड शहरातील गुगळे प्रवासी शेड सुरू करा

नगर- 

कोरोनामुळे प्रत्येक क्षेत्रावर विपरित परिणाम झाला आहे. आर्थिक संकटाच्या विवंचनेत अनेकजण आहेत. त्यांना उभारी देण्यासाठी सरकार व बँकेने पाऊल उचलले आहे. समाजातील प्रत्येक घटकांच्या पाठीशी सरकार आणि बँक भक्कमपणे उभी आहे. बँकेच्या माध्यमातून राबविण्यात आलेला जिल्हा कर्जवितरण मेळावा हा अतिशय चांगला व स्तुत्य उपक्रम असून, प्रत्येकाने त्याचा फायदा घेऊन स्वतःची, तसेच जिल्ह्याची प्रगती साधावी. बँकेची अर्थव्यवस्था ही कर्जदारांवर अवलंबून असते, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर यांनी केले.

जिल्ह्यातील विविध बँका व अग्रणी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा कर्जवितरण मेळाव्याप्रसंगी 5 हजार 285 खातेदारांना 117 कोटी 50 लाखांच्या कर्जाचे वितरण श्री. यमगर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे जिल्हा अग्रणी व्यवस्थापक प्रकाश शेंडे, सेंट्रल बँकेचे प्रकाश साबळे, बँक ऑफ महाराष्ट्रचे रिजनल मॅनेजर हरिशंकर वस्स्, नाबार्डचे शीलकुमार जगताप, उपजिल्हा निबंधक दिग्विजय आहेर, मंगलम, गीतांजली काटकर, एस. एस. शिंदे, बाबासाहेब सरोदे, अमोल  कणसे यांच्यासह बँकेचे अधिकारी, पदाधिकारी व कर्जदार लाभार्थी उपस्थित होते.

यमगर पुढे म्हणाले की, बँकेच्या माध्यमातून कर्जदारांनी जे कर्ज घेतले आहे, ज्या कामासाठी घेतले आहे, त्या कामासाठीच त्याचा वापर करावा. कर्जाची परतफेड वेळेवर करावी. बँकेत आपली पत निर्माण करावी. बँक आपल्या दारी आली आहे, त्याचा फामदा करून घ्यावा. पैसे घ्यायचे आणि द्यायचे. त्यांच्यावर जो नफा मिळतो, त्यावर बँक चालते. आपण कर्ज वेळेत भरल्यास त्याचा फायदा इतर कर्जदारांना कर्ज देण्यासाठी होतो. याचा आपण विचार केल्यास सर्वांची उन्नती त्या माध्यमातून होईल, असे ते म्हणाले.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे जिल्हा अग्रणी व्यवस्थापक प्रकाश शेंडे म्हणाले की, अर्थव्यवस्था हा देशाचा प्राण आहे. सरकारी यंत्रणा, बँका या देशातील बेरोजगारी व गरीबी दूर करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. देशाच्या विकासाच्या क्षेत्रात जीडीपी वाढवण्यासाठी बँकेच्या माध्यमातून पाऊल उचलल जात आहे. कोरोनामुळे मोठ्या संकटात आपण सापडलो आहोत. त्यातून बाहेर काढण्यासाठी कर्जवितरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, आज जिल्ह्यातील विविध बँकांच्या माध्यमातून 5 हजार 185 खातेदारांना 117 कोटी 50 लाख रुपयांचे कर्जाचे वितरण विविध योजनांच्या माध्यमातून  करण्यात आल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब सरोदे यांनी केले, तर गीतांजली काटकर यांनी आभार मानले.

COMMENTS