Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सहा देवस्थानच्या 3 कोटीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी

तीर्क्षक्षेत्रांचा विकास साधण्यात आ. आशुतोष काळे यशस्वी

कोपरगाव : कोपरगाव मतदार संघाला विकासाच्या वाटेवर आणणार्‍या आ. आशुतोष काळे यांनी  पौराणिक वारसा असलेल्या मतदार संघातील धर्मिक तीर्थक्षेत्रांचा विक

आगाऊ पिकविमा भरपाई द्याः आ. काळे यांची कृषीमंत्र्यांकडे मागणी
 कोपरगावात कोरडा दुष्काळ जाहीर करा ः आ. आशुतोष काळेंची शासनाकडे मागणी
जायकवाडीला पाणी सोडणे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान

कोपरगाव : कोपरगाव मतदार संघाला विकासाच्या वाटेवर आणणार्‍या आ. आशुतोष काळे यांनी  पौराणिक वारसा असलेल्या मतदार संघातील धर्मिक तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी निधी मिळावा व भक्तांना चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पाठपुरावा करीत होते. या पाठपुराव्यातून मतदार संघातील सहा देवस्थानांच्या विकासासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन 2023-24 अंतर्गत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाणे तब्बल 3 कोटी निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव मतदार संघाला मोठी धार्मिक परंपरा असल्यामुळे अनेक गावात असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेले अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. मात्र मतदार संघातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराच्या विकासासाकडे मागील काही वर्षात दुर्लक्ष झाल्यामुळे या देवस्थानांचा विकास रखडला जावून यात्रा उत्सवाच्या निमित्ताने वर्षानुवर्षांपासून नियमित येणार्‍या भक्तांना आवश्यक सोयी-सुविधा मिळत नव्हत्या. त्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी अनेक देवस्थानांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळवून देवून या तीर्थक्षेत्रांच्या व यात्रा स्थळांच्या विकासाला निधी आणण्यासाठी आ. आशुतोष काळे पर्यटन विभागाकडे पाठपुरावा करीत होते. मतदार संघातील माहेगाव देशमुख येथील अमृतेश्‍वर महादेव मंदिर येथे सभामंडप बांधकाम व परिसर सुशोभिकरण करणे (50 लक्ष),  मौजे कोळपेवाडी येथील महेश्‍वर मंदिर येथे सभामंडप बांधकाम व परिसर सुशोभिकरण करणे (50 लक्ष), वारी येथील रामेश्‍वर मंदिराच्या विकासासाठी (64.50 लक्ष), ब्राम्हणगांव येथील श्री. जगदंबा माता देवस्थान मंदिर व परिसर सुशोभिकरण करणे (50 लक्ष), चांदेकसारे येथील भैरवनाथ देवस्थान मंदिर परिसर सुशोभिकरण करणे (50लक्ष), मतदार संघातील राहाता तालुक्यातील वाकडी येथील खंडोबा मंदिर देवस्थान मंदिर परिसर सुशोभिकरण करणे (35.50 लक्ष) असा एकूण 3 कोटी निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी मंदिरापर्यंत रस्ते, पाणी पुरवठ्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, शौचालय, रस्त्यावरील दिवे आणि संरक्षण भिंत, वृक्ष लागवड व परिसर सुशोभिकरण यासारखे अनेक कामे होणार आहे. त्यामुळे या तिर्थक्षेत्रांना भेटी  देणार्‍यांची संख्या लक्षणीय वाढ होवून त्या त्या गावातील व्यवसाय वृद्धी होवून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे मतदार संघातील माहेगाव देशमुख, कोळपेवाडी, वारी, ब्राम्हणगांव, चांदेकसारे, वाकडी ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

COMMENTS