Homeताज्या बातम्यामनोरंजन

चेक बाऊन्स प्रकरणी राखी सावंतचा भाऊ राकेश सावंतला अटक

मुंबई प्रतिनिधी - अभिनेत्री राखी सावंत हिच्या भावाला ओशिवरा पोलिसांनी चेक बाऊन्स प्रकरणी अटक केली आहे. तीन वर्षांपूर्वी व्यावसायिकाच्या तक्रारी

अडीच कोटींचे अंमलीपदार्थ जप्त, 21 जणांना अटक
केज तालुक्यातील येवता येथे बजरंग बप्पा सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त जय्यत तयारी
कृषी प्रदर्शन शेतकर्‍यांसाठी दिशा दर्शक ठरेलः मुख्यमंत्री शिंदे

मुंबई प्रतिनिधी – अभिनेत्री राखी सावंत हिच्या भावाला ओशिवरा पोलिसांनी चेक बाऊन्स प्रकरणी अटक केली आहे. तीन वर्षांपूर्वी व्यावसायिकाच्या तक्रारीवरून अ जामीन पात्र वॉरंट वरती राकेश अनंत सावंतला अटक करण्यात आलेली आहे. न्यायालयाने राकेश सावंत यास पैसे परत करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला होता. मात्र राकेश सावंत याने पैसे परत न केल्यामुळे न्यायालयाने अटक वॉरंट काढले. रविवारी ओशिवरा पोलिसांनी राकेश सावंत याला अटक केली होती. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 22 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अभिनेत्री राखी सावंत सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता राखीचा भाऊ एका जुन्या प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. आता राखी सावंत यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.

COMMENTS