Homeताज्या बातम्या

महर्षी कर्वे’ पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहनएस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार

मुंबई : एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या वतीने यंदापासून सुरू करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या ‘भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे पुरस्कारा’साठी अर्

राज्यात आरोग्य सेवांचे जाळे अधिक मजबूत करणारमुख्यमंत्री फडणवीस : नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत ‘उडान’ प्रकल्पाला पाच वर्षांची मुदतवाढ
उपमुख्यमंत्री शिंदे यांचा दिल्ली दौरा पुन्हा चर्चेतपक्षीय बैठका, खासदारांशी चर्चा आणि नव्या समीकरणांची उत्सुकता
एसटी महामंडळाने प्रवाशांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावाउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ; ‘राजामाता जिजाऊ’ बससेवेचे लोकार्पण


मुंबई : एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या वतीने यंदापासून सुरू करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या ‘भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे पुरस्कारा’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत. शिक्षण, समाजकार्य, महिला सक्षमीकरण आणि विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणार्‍या व्यक्ती वा संस्थेच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार येत्या 5 जुलै 2026 रोजी महर्षी धोंडो केशव कर्वे विद्यापीठाच्या 111 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रदान करण्यात येणार असून पुरस्काराचे स्वरूप प्रशस्तिपत्र आणि रोख रक्कम असे आहे. शिक्षण, सामाजिक कार्य व सामाजिक समस्या निवारण, महिला सबलीकरण (महिलांसाठी केलेले कार्य तसेच महिलांनी केलेले उल्लेखनीय कार्य), अर्थ, प्रशासन, संरक्षण तसेच विज्ञान व संशोधन या क्षेत्रांमध्ये विशेष योगदान देणार्‍या व्यक्ती वा संस्थांचे नाव या पुरस्कारासाठी विचारात घेतले जाणार आहे. पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती किंवा संस्थेकडून नामनिर्देशनासाठी दिनांक 22 जून 2026 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज निर्धारित मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह दोन प्रतींमध्ये कुलसचिव, एस एन डी टी महिला विद्यापीठ, 1, नाथीबाई ठाकरसी मार्ग, न्यू मरीन लाइन्स, मुंबई – 400 020 येथे सायंकाळी 5 वाजेपर्यंत किंवा तद्पूर्वी सादर करणे आवश्यक आहे. पुरस्कारासंदर्भातील सविस्तर माहिती, पात्रता निकष तसेच अर्जाचा नमुना विद्यापीठाच्या ुुु. ीपवीं.रल.ळप या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इच्छुक व्यक्ती, संस्थने या संधीचा लाभ घेऊन विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS