रोजगार हमी योजनेतील कामांच्या लेबर बजेटची आखणी करा : नंदकुमार

Homeमहाराष्ट्रमराठवाडा

रोजगार हमी योजनेतील कामांच्या लेबर बजेटची आखणी करा : नंदकुमार

औरंगाबाद : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत 2022-23 या आर्थिक वर्षात "मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर मी समृद्ध" या विचारातू

औरंगाबादेत दुसरीतल्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या? | LokNews24
देशाचा जिवंत आत्मा म्हणजे खरा हिंदुस्थान – जावेद अख्तर
बॉलीवूड अभिनेत्री अर्शिन मेहता सोबत दिलखुलास संवाद l Bollywood Actress Arshin Mehta l पहा LokNews24

औरंगाबाद : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत 2022-23 या आर्थिक वर्षात “मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर मी समृद्ध” या विचारातून रोहयो कामांच्या लेबर बजेटची आखणी करण्याची सूचना राज्याचे मृद, जलसंधारण व रोहयो विभागाचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांनी औरंगाबाद विभागातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत समृद्धी लेबर बजेट 2022-23 च्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अपर मुख्य सचिव नंदकुमार बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर ,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाचे आयुक्त शंतनू गोयल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (औरंगाबाद) डॉ.मंगेश गोंदावले, जालनाचे प्रताप सवडे, परभणीचे शिवानंद टाकसाळे, नांदेडच्या वर्षा ठाकूर, हिंगोलीचे आर.बी. शर्मा, लातूरचे अभिनव गोयल ,बीडचे अजित कुंभार, उस्मानाबादचे राहुल गुप्ता, उप आयुक्त (रोहयो) समीक्षा चन्द्राकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) (औरंगाबाद) मंदार वैद्य, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पी.एस.शिंदे ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र अहिरे, आदींची उपस्थिती होती. नंदकुमार म्हणाले की, रोजगार हमी योजनेअंतर्गत अधिकचे काम देऊन दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना आर्थिक दृष्ट्या समृद्ध करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या हेतूने गाव समृद्ध करण्यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाला नरेगाच्या माध्यमातून वर्षाला निव्वळ नफा एक लाख रुपयांपर्यंत मिळायला हवा यासाठी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गावपातळीवर नियोजन करावे. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला पाहिजे तेव्हा काम देण्यात येऊन त्यांची आर्थिक उन्नती साधण्यात यावी अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. गोयल म्हणाले की, रोजगार हमी योजना शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी काम करण्यात यावे. प्रत्येक जिल्ह्याने आपल्या जिल्ह्यात जास्तीत जास्त मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्व अधिकारी यांनी पुढाकार घेण्याची सूचना केली.

COMMENTS