आमदारांपाठोपाठ खासदारांचाही शिंदेंना पाठिंबा .

Homeताज्या बातम्या

आमदारांपाठोपाठ खासदारांचाही शिंदेंना पाठिंबा .

१२ खासदार एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणार असल्याचा दावा ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये .

शिवसेनेचे १२ खासदार एकनाथ शिंदें (Eknath Shinde) ना पाठिंबा देणार असल्याचा दावा भाजपचे वर्ध्याचे खासदार रामदास तडस(Ramdas Tadas) यांनी केला आहे . शिव

चॉकलेट घशात अडकून 4 वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू
वसंतराव नाईकांनी राज्यात हरितक्रांती घडवली – राजेंद्र आमटेकृषी दिनी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने अभिवादन
केंद्र शासनाने साखर निर्यातीचा निर्णय घ्यावा ः आमदार आशुतोष काळे

शिवसेनेचे १२ खासदार एकनाथ शिंदें (Eknath Shinde) ना पाठिंबा देणार असल्याचा दावा भाजपचे वर्ध्याचे खासदार रामदास तडस(Ramdas Tadas) यांनी केला आहे . शिवसेना आमदारांपाठोपाठ अनेक खासदार भाजपसोबत जाण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा सुरू असतानाच तडस यांनी थेट आकडाच सांगितल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे . भाजपचे खासदार रामदास तडस(MP Ramdas Tadas) अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र प्रांतिक तैलीक(Maharashtra Provincial Oil) महासभेचा नाशिक विभागीय पदाधिकारी मेळावा शिर्डी(Shirdi) येथे संपन्न झाला . या मेळाव्यासाठी रविवारी सायंकाळी खा. तडस शिर्डीमध्ये आले होते . या देशात ओबीसी ५२ टक्के असून त्यातही तेली समाज तेरा टक्के असल्याने या समाजाला न्याय मिळण्यासाठी आमचा लढा सुरू आहे . ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्याकडे केली असल्याचे खा. तडस यांनी सांगीतले .

COMMENTS