आगामी 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील व्यक्तींचे होणार लसीकरण : जावडेकर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आगामी 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील व्यक्तींचे होणार लसीकरण : जावडेकर

केंद्रीय मंत्रीमंडळाने 45 वर्षांपेक्षा अधिक वय असणार्‍या सर्व भारतीय नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्यासाठी परवानगी दिली आहे.

मुंबईतील मोर्चासाठी डोंबिवली वरून ठाकरे गटातील शिवसैनिक रवाना… 
प्रस्थापितांची सत्ता उधळून लावण्यासाठी शेतकरी परिवर्तन महाआघाडीला साथ द्या-आ.संदीप क्षीरसागर
रेल्वे चालवणार आजपासून भारत गौरव ट्रेन

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रीमंडळाने 45 वर्षांपेक्षा अधिक वय असणार्‍या सर्व भारतीय नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे आगामी 1 एप्रिलपासून सुरु होणार्‍या लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यामध्ये 45 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांचे लसीकरण केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. 

दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना जावडेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षेखाली मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. भारतामध्ये अत्यंत वेगाने आणि चांगल्या पद्धतीने करोना प्रतिबंधक लसींचे लसीकरण केलं जात आहे. आतापर्यंत 4 कोटी 85 लाख कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत. मागील आठवड्यामध्ये दिवसाला करोना लसींचे 20 लाख डोस देण्यात आल्याची माहितीही जावडेकरांनी दिली. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य सेवा आणि करोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर 16 फेब्रुवारीपासून 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणार्‍यांचं लसीकरण सुरु करण्यात आले. त्यानंतर 1 मार्चपासून 45 हून अधिक वय असणार्‍या आणि इतर व्याधी असणार्‍यांचे लसीकरण करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये करोना टास्क फोर्सचा सल्ला आणि वैज्ञानिक आधारांच्या सहाय्याने दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत. त्यापैकी पहिला निर्णय म्हणजे 45 वर्षांपेक्षा अधिक वय असणार्‍या सर्व नागरिकांना करोनाची लस उपलब्ध होणार असल्याचे जावडेकरांनी सांगितले. तसेच या बैठकीमधील दुसरा महत्वाचा निर्णय असा घेण्यात आला आहे की दोन डोसदरम्यान 4 किंवा 6 आठवड्यांचा वेळ असावा असे निश्‍चित करण्यात आले होते. परंतु, आता कोविशिल्डचा डोस 4 ते 8 आठवड्यांच्यादरम्यान घेणे योग्य ठरेल असे संशोधकांना आढळून आलेय. त्यामुळे ही सवलतही देण्यात आल्याचे जावडेकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान देशात निर्माण झालेल्या कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्ही लसी उत्तम परिणामकारक असून त्यांचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे जावडेकर यांनी स्पष्ट केले.

COMMENTS