Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्यापार्‍यांसाठी अ‍ॅड. शेख शफीक भाऊ सरसावले; शिष्टमंडळासोबत एस.पी. साहेबांची घेतली भेट !

दुकानांसाठी रात्री दहाची वेळ एक तासाने वाढवून अकरा करण्याची केली मागणी

बीड प्रतिनिधी- पोलीस प्रशासनाकडून रात्री दहा वाजताच दुकाने बंद करायला भाग पाडले जात असल्याने व्यावसायिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी एआयएमआयएम

नागरिकांना राहण्यायोग्य सर्वोत्तम असे महानगर विकसित करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
एमपीएससी परीक्षेत महिलांमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या सोनाली मात्रे हिचे जन्मभूमीत जंगी स्वागत
कर्जतच्या वनक्षेत्रात हरणाची शिकार

बीड प्रतिनिधी- पोलीस प्रशासनाकडून रात्री दहा वाजताच दुकाने बंद करायला भाग पाडले जात असल्याने व्यावसायिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी एआयएमआयएम चे बीड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. शेख शफीक भाऊ यांनी ज्येष्ठ समाजसेवक मोईनोद्दिन मास्टर यांच्यासह शिष्टमंडळासोबत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेऊन व्यावसायिकांना दुकाने निदान रात्री अकरा वाजेपर्यंत तरी उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
गेल्या काही महिन्यात बीड शहरात रात्री घडलेल्या अप्रिय घटनांमुळे पोलीस प्रशासनाने रात्री दहा वाजताच संपूर्ण बीड शहरातील दुकाने बंद करण्यात यावी असे फर्मान काढून त्यावर अंमलबजावणी सुरू केली. एकामागोमाग एक घडलेल्या अप्रिय घटनांमुळे बीड शहरवासियांसह व्यापारीही भेदरलेले होते. यामुळे कधी नव्हे ते अकरा ऐवजी रात्री दहा वाजताच दुकाने बंद करण्याची वेळ व्यापार्‍यांवर आली आणि जनतेने ही घडलेल्या घटनांमुळे प्रशासनाने  घेतलेला हा निर्णय निमुटपणे शिरसावंद्य मानून गप्प गुमान राहणे पसंत केले परंतु काही दिवस उलटल्यानंतर या निर्णयामुळे व्यापार्‍यांना बसत असलेला आर्थिक फटका आणि सर्वसामान्य गोरगरीब यांना येत असलेल्या अडचणी समोर येऊ लागल्या आणि मग या निर्णयाबद्दल व्यापार्‍यांसह जनतेनेही बोलायला सुरुवात केली. शिवाय पूर्वीप्रमाणे निदान रात्री अकरा वाजेपर्यंत तरी पोलीस प्रशासनाने दुकाने उघडे ठेवण्याची सूट द्यावी जी जवळपास प्रत्येक जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी असते असे बोलले जाऊ लागले मात्र आता पोलीस प्रशासनासह जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे हा विषय मांडणार कोण आणि कसा ? याची शहरभरात चर्चा होऊ लागली. असे असताना ए एआयएमआयएम चे बीड जिल्हाध्यक्ष ड. शेख शफिक भाऊ पुढे सरसावले आणि ज्येष्ठ नेते तथा सामाजिक कार्यकर्ते सय्यद मोईनुद्दीन मास्टर यांना सोबत घेऊन शिष्टमंडळासह जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेत सर्व वस्तुस्थिती सविस्तरपणे मांडली व मागणी केली की, भलेही रात्री अकरा वाजेनंतर दुकाने सक्तीने बंद करावयास लावा परंतु पूर्वीप्रमाणे निदान अकरा वाजेपर्यंत तरी दुकाने उघडे ठेवण्याची परवानगी व्यावसायिकांना द्या अशी मागणी केली. यावर पोलीस अधीक्षक ठाकूर यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत अवश्य विचार केला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी ड. शेख शफीक भाऊ व ज्येष्ठ नेते मोईन मास्टर यांच्यासह पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष खन्ना भैय्या, शहराध्यक्ष शिवाजी भोसकर, साजन चौधरी, सय्यद सैफअली (लालु भैय्या) आदी उपस्थित होते.

ईद उल अज़हा आणि आषाढी एकादशी साठी मानले पोलीस प्रशासनाचे आभार – जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेतल्यानंतर ईद उल अज़हा व आषाढी एकादशीसाठी चोख नियोजन व बंदोबस्त केल्याने हे दोन्ही सण शांततेत, मोठ्या उत्साहात व बंधू भावाने पार पडले. याबद्दल व केलेल्या सहकार्याबद्दल शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाचे आभार मानले.

शहरात पोलीस चौक्या सुरू करा – मोईनोद्दीन मास्टर – शहरातील किल्ला मैदान पोलीस चौकी आणि माळीवेस पोलीस चौकी येथील बंद पडलेल्या पोलीस चौक्या पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात याव्यात आणि बशीरगंज येथे नवीन पोलीस चौकी देण्यात यावी. अशी मागणी ही कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता ज्येष्ठ समाजसेवक मोईनोद्दीन मास्टर यांनी एस.पी. नंदकुमार ठाकूर यांच्याकडे केली असता ठाकूर यांनी यावर कार्य सुरू असल्याचे म्हटले.

COMMENTS