Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डी नगरपरिषदेत समित्यांचे वाटप

पाथर्डी : पाथर्डी नगरपरिषदेच्या स्थायी व विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांच्या निवडी सोमवारी बिनविरोध पार पडल्या. या समितीमध्ये महत्वाची समजली जाणाऱ्

पाथर्डीत हर्षवर्धन सपकाळांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
शेवगाव सायकल असोसिएशनतर्फे गुणवंत महिलांचा सन्मान
अक्षय कर्डिलेंची बदनामी करणाऱ्याचा छडा लावावा; अन्यथा आंदोलन ; भाजप कार्यकर्त्यांचा उपोषणाचा इशारा

पाथर्डी : पाथर्डी नगरपरिषदेच्या स्थायी व विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांच्या निवडी सोमवारी बिनविरोध पार पडल्या. या समितीमध्ये महत्वाची समजली जाणाऱ्या बांधकाम समितीच्या सभापती पदी जेष्ठ नगरसेवक नंदकुमार उर्फ बाबुराव शेळके तर महिला बालकल्याण च्या सभापतीपदी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडून विजयी झालेल्या व भाजपच्या सहयोगी सदस्य असलेल्या वंदना टेके यांची वर्णी लागली.

सोमवारी सकाळी पालिका सभागृहात पीठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले.

 निवड झालेल्या समित्यांच्या सभापती व सदस्य पुढीलप्रमाणे

स्थायी समिती – नगराध्यक्ष अभय आव्हाड – सभापती तर सदस्य म्हणून – बाबुराव शेळके, विठ्ठल बोरुडे ,मंगल कोकाटे ,वंदना टेके तसेच बजरंग घोडके व डॉ शारदा गर्जे, बांधकाम समिती – नंदकुमार उर्फ बाबुराव शेळके –  सभापती तर सदस्य म्हणून सुभाष बोरुडे ,संजय देशमुख ,प्रतिक नांगरे व सविता भापकर, आरोग्य समिती – बंडूशेठ उर्फ विठ्ठल बोरुडे – सभापती तर सदस्य म्हणून जगदीश मुने , अमोल गर्जे , मनीषा उदमले व देविदास पवार

पाणीपुरवठा – उपनगराध्यक्ष मंगल कोकाटे – सभापतीपदसिद्ध तर सदस्य म्हणून संजय देशमुख ,सुभाष बोरुडे, किरण खेडकर व मंगल सोनटक्के महिला बालकल्याण – वंदना टेके –  सभापती तर सदस्य म्हणून वर्षा मोरे ,ज्योती पवार ,मनीषा उदमले व रेखा हंडाळ यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर आमदार मोनिका राजळे यांनी पालिका सभागृहात येवून सभापतींचे अभिनंदन केले  यावेळी नगराध्यक्ष अभय आव्हाड व नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीसाठी नगरसेविका दीपाली बंग, सविता भापकर व स्वीकृत सदस्य संजय भागवत हे गैरहजर होते.

COMMENTS