Homeताज्या बातम्या

चकलांबा येथे भारती बांगर इंटरनॅशनल स्कूलची बस सेवा सुरू; पालकांकडून शाळेचे आभार

चकलांबा : गेवराई येथील नामांकित भारती बांगर इंटरनॅशनल स्कूलने शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची संख्या नव्हे, तर त्यांचे भविष्य महत्त्वाचे असल्याचे दाख

मलकापूर येथील शेतरस्त्यावरील अतिक्रमण हाटवले, 2 वर्षानंतर रस्ता मोकळा  तहसील प्रशासनाचे आभार – भागवत गीते
पुरुषोत्तम  पुरी यात्रेत भीषण बोट दुर्घटना!दोन महिला भाविकांचा मृत्यू,अनेक जखमी; ट्रस्ट व प्रशासनाच्या नियोजनावर संताप
आ. संदीप क्षीरसागरांची महसूलमंत्र्यांशी भेट; अनेक प्रलंबित प्रश्न लागणार मार्गी

चकलांबा : गेवराई येथील नामांकित भारती बांगर इंटरनॅशनल स्कूलने शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची संख्या नव्हे, तर त्यांचे भविष्य महत्त्वाचे असल्याचे दाखवून देत चकलांबा गावासाठी बस सेवा सुरू केली आहे. विशेष म्हणजे, गावातील केवळ आठ विद्यार्थ्यांसाठी शाळेने बस पाठवण्याचा निर्णय घेतल्याने पालक व ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे मोठे स्वागत होत आहे.
चकलांबा गावातील विद्यार्थ्यांना गेवराई येथे शिक्षणासाठी ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत पत्रकार असलम कादरी यांनी गावातील पालकांच्या वतीने शाळा व्यवस्थापनाकडे बस सेवेची मागणी केली होती. गेवराईपासून सुमारे 32 किलोमीटर अंतरावर असलेल्या चकलांबा गावातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून शाळा व्यवस्थापनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेत बस सेवा सुरू केली. फक्त आठ विद्यार्थी असल्यामुळे अनेक ठिकाणी अशा मागण्या दुर्लक्षित केल्या जातात. मात्र भारती बांगर इंटरनॅशनल स्कूलने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे. याबाबत पालकांनी समाधान व्यक्त करत, आमच्या मुलांना आता सुरक्षित आणि वेळेवर शाळेत जाता येणार आहे. केवळ आठ विद्यार्थ्यांसाठी बस सेवा उपलब्ध करून देणे ही मोठी गोष्ट आहे. शाळा व्यवस्थापनाचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो, अशी प्रतिक्रिया दिली. सामाजिक कार्यकर्ते शरद खेडकर, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक खेडकर, शोएब कादरी, युवराज शिंदे, तय्यबभाई शेख तसेच पालक वर्गाने शाळा व्यवस्थापनाचे अभिनंदन करत आभार व्यक्त केले. शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे. अंतर आणि विद्यार्थ्यांची संख्या यापेक्षा मुलांचे भविष्य महत्त्वाचे असते, हे भारती बांगर इंटरनॅशनल स्कूलने आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे, असे मत गावकर्‍यांनी व्यक्त केले. शाळेच्या या निर्णयाचे चकलांबा परिसरात सर्वत्र कौतुक होत असून, शिक्षण क्षेत्रातील सामाजिक बांधिलकीचा हा आदर्श नमुना मानला जात आहे.

COMMENTS