ओडिशाच्या चांदीपूर येथे पिनाकची यशस्वी चाचणी

Homeताज्या बातम्या

ओडिशाच्या चांदीपूर येथे पिनाकची यशस्वी चाचणी

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विस्तारित क्षेत्रात रॉकेट्सचा मारा करणाऱ्या स्वदेशी पिनाकची यशस्वी चाचणी घेतली आहे.

देवळाली प्रवरा येथील दोन उद्योजक शेतकरी पुत्रांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विशेष गौरव
राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार
लोकशक्ती आघाडी धरणग्रस्तांच्या पाठीशी ः माळवदे

नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विस्तारित क्षेत्रात रॉकेट्सचा मारा करणाऱ्या स्वदेशी पिनाकची यशस्वी चाचणी घेतली आहे. ही चाचणी ओडिशाच्या समुद्रकिनारी असलेल्या चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजमध्ये (आयटीआर) घेण्यात आली आहे. सुमारे 122 एमएमचे कॅलिबर रॉकेट्स हे मल्टी बॅरल रॉकेट लाँचरमध्ये (एमबीआरएल) लाँच केले आहे. मोहिमेतील सर्व उद्दिष्ट हे पार पडली आहे. 

    विस्तारित अंतरावरील टप्प्यातील पिनाका रॉकेट सिस्टिममध्ये 45 किमीपर्यंत टार्गेट उद्धवस्त करता येते. हे रॉकेट यंत्रणा पुण्यातील अर्मामेंट रिसर्च आणि डेव्हलपमेंट एस्टॅबिलिशमेंटन (एआरडीई) आणि हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरटरीने (एचईएमआरएल) विकसित केली आहे. त्यासाठी नागपूरच्या इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्हने उत्पादन सहकार्य केले आहे. अधिक टप्प्यावर मारा करण्याचे सामर्थ्य वाढविण्यासाठी पिनाका यंत्रणा अधिक विकसित केलेय. अद्ययावत पिनाक रॉकेटचे यशस्वी लाँचिंग झाल्याने केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि उद्योगाचे अभिनंदन केले आहे.

डीआरडीओचे चेअरमन डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी रॉकेटची प्रायोगिक चाचणी यशस्वी घेण्यासाठी परिश्रम घेतलेल्या टीमचे अभिनंदन केले. पिनाक लाँचिंग यंत्रणा ही कंपनी स्वदेशी तंत्रज्ञानातून तयार केली आहे. पिनाक डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ऑफ डिफेन्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑरगायनेझशन ही एल अँड टीच्या मालकीची आहे. या कंपनीने तयार केलेल्या पिनाका यंत्रणेत सर्व वातावरणात वापरण्यात येऊ शकणारे उच्च तंत्रज्ञान आहे. यापूर्वी पिनाक यंत्रणा ही संरक्षण मंत्रालयाच्या ऑर्डरनंतर दोन रेजिमेंटला दिल्याचे कंपनीने सांगितले.

COMMENTS