Homeताज्या बातम्यामनोरंजन

टीव्ही अभिनेता ऋतुराज सिंह यांचे वयाच्या 59 व्या वर्षी निधन

मुंबई प्रतिनिधी - छोट्या पडद्यावरील दिग्गज अभिनेते ऋतुराज सिंह यांचे मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. मुंबई

आर्ची’ला पाहताच चाहत्यांना आठवल्या स्मिता पाटील |
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे अध्यक्ष मोहनराव चव्हाण यांचे निधन
सीमावादाचा प्रश्‍न केव्हा सुटणार ?

मुंबई प्रतिनिधी – छोट्या पडद्यावरील दिग्गज अभिनेते ऋतुराज सिंह यांचे मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील त्यांच्या राहत्या घरीच मध्यरात्रीच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या आकस्मिक निधनावर टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. तर, चाहत्यांना तीव्र धक्का बसला आहे. ‘अनुपमा’ मालिकेत त्यांनी काम केले होते. 90 च्या दशकात झी टीव्हीवर ‘तोल मोल के बोल’ हा रिॲलिटी गेम शो होस्ट करून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ऋतुराज सिंह यांनी टीव्हीवरील अनेक मालिका, अनेक चित्रपट आणि ओटीटी शोमध्ये काम केले होते. वर्ष 1993 मध्ये झी टीव्हीवर त्याचा प्रसारित झालेला टीव्ही शो ‘बनेगी अपनी बात’ही खूप गाजला. ‘हिटलर दीदी’, ‘ज्योती’, ‘शपथ’, ‘अदालत’, ‘आहट’, ‘दीया और बाती’, वॉरियर हाय’, ‘लाडो 2’ यांसारख्या मालिकांमध्येही त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

COMMENTS