शनैश्वर देवस्थान अँप घोटाळा – सायबर पोलिसांकडून अखेर गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्या

शनैश्वर देवस्थान अँप घोटाळा – सायबर पोलिसांकडून अखेर गुन्हा दाखल

सोनई // प्रतिनिधी- बहुचर्चित शनिशिंगणापूर ऑनलाईन अ‍ॅप घोटाळा प्रकरणी अखेर अहिल्यानगर सायबर पोलिसांनी कारवाई करत शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात

स्थानिक स्वराज्य संस्थांवरील ‘प्रशासकीय राज’ हटवा : डॉ.हुलगेश चलवादी 
नांदेड जिल्ह्यात 47 मिमी पावसाची नोंद; ओढे, नाल्यांना पूर
अदानी समूह संशयाच्या फेर्‍यात

सोनई // प्रतिनिधी-

बहुचर्चित शनिशिंगणापूर ऑनलाईन अ‍ॅप घोटाळा प्रकरणी अखेर अहिल्यानगर सायबर पोलिसांनी कारवाई करत शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात अज्ञात अ‍ॅप धारक, संकेतस्थळ मालकांविरोधात व त्यांच्या अज्ञात साथीदारा विरोधात  गुन्हा दाखल केला आहे.

ऑनलाईन पूजा अँप घोटाळा बाबत प्रथम काँग्रेसचे कामगार सेलचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी उपोषण करत याप्रकरणी आवाज उठवला होता. माजी विश्वस्थ वैभव शेटे, शुभम बंब यांनी धर्मदाय कडे तक्रार निवेदन दिले होते.शनिशिंगणापूर अँप प्रकरणी माध्यमानी पण मोठा आवाज उठवला होता.

यामुळे प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष वेधत नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील व आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला होता.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अँप घोटाळाची अतिरिक्त पोलीस महासंचालक सायबर विभाग यांच्या मार्फत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या लक्षवेधी नंतर सायबर पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल करण्या बाबत हालचाल केली. सायबर पोलीस स्टेशन, अहिल्यानगर यांनी पुढाकार घेऊन शनि शिंगणापूर पोलीस ठाण्यात अँप प्रकरणी गुन्हा दाखल केला.

अहिल्यानगर सायबर विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकासाहेब काकडे (वय 32) यांनी फिर्याद दाखल केली असून गु.र.नं. 165/2025 अन्वये भारतीय दंड संहिता कलम 318(4), 336(3), 3(5) व माहिती व तंत्रज्ञान अधिनियम 66D अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अँप घोटाळातील संशयित संकेतस्थळे: 1घरमंदिर डॉट इन अँप,2 ऑनलाईन प्रसाद डॉट कॉम,3.पूजा परी सेवा डॉट कॉम,4.हरी ओम अँप,5.ई पूजा डॉट कॉम या संकेतस्थळांच्या अज्ञात मालकांनी श्री शनैश्वर देवस्थानचे फोटो, मंदिराचे महाद्वार व दृश्ये वापरून, कोणतीही अधिकृत परवानगी न घेता, व्हीआयपी दर्शन, अभिषेक, पूजा व तेल चढावा सेवा ऑनलाईन माध्यमातून बुकिंग करून आर्थिक फायदा कमावला.

या खोट्या प्रचारामुळे भाविकांची दिशाभूल झाली. अधिकृत पुजारी नसताना देखील ‘मंदिरात पूजा केली जाईल’ असा बनावट मजकूर वेबसाईट्सवर प्रसारित करण्यात आला, आणि याच आधारे अनियमित दराने रक्कम उकळण्यात आली, मात्र ही रक्कम देवस्थानाला न देता, स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्यात आली. या प्रकरणात सायबर पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पथकाने प्राथमिक तांत्रिक तपास करत साक्षी व पुरावे गोळा केले आहेत.विशेष म्हणजे, यापूर्वी देवस्थानचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ भिमाशंकर दरंदले व कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ केरुजी दरंदले यांना वरिष्ठ यांनी प्रकाराबाबत वेळोवेळी कळवूनही त्यांनी कोणतीही लेखी तक्रार सादर केली नव्हती.

त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सायबर पोलिसांनी स्वतःच पुढाकार घेऊन गुन्हा दाखल केला आहे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर संकेतस्थळांचे मालक व त्यांचे साथीदार अद्याप अज्ञात आहेत.सायबर गुन्हे तपास करताना माहिती मिळवण्यासाठी वेळ लागतो. मात्र तांत्रिक पद्धतीने तपास करून लवकरच दोषीवर कठोर कारवाई केली जाणार आहे असे अहिल्यानगर सायबर पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी सांगितले 

COMMENTS