लाळ्या खुरकूत आजाराचे थैमान, चार गाईंचा मृत्यू

Homeमहाराष्ट्र

लाळ्या खुरकूत आजाराचे थैमान, चार गाईंचा मृत्यू

देवळाली प्रवरा प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील आंबी व अंमळनेर येथे लाळ्या खुरकूत आजाराने थैमान घातले असून अनेक जनावरांना याची बाधा झाली आहे. लाळ्या ख

यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी; 92 टक्के पावसाचा अंदाजभारतीय हवामान विभागाकडून पहिला अधिकृत अंदाज जाहीर
कोपरगावमध्ये नरेंद्रचार्य महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा
प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या कथेची बी.ए. अभ्यासक्रमात निवड

देवळाली प्रवरा प्रतिनिधी

राहुरी तालुक्यातील आंबी व अंमळनेर येथे लाळ्या खुरकूत आजाराने थैमान घातले असून अनेक जनावरांना याची बाधा झाली आहे. लाळ्या खुरकूत आजाराने चार गाई दगावल्याने पशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

आंबी येथील चारीवरील भावेश तागड, नितीन मतमोल यांच्या दोन दुभत्या जर्सी गाई व डुकरे वस्तीवरील माजी सरपंच शंकर डुकरे यांची एक गाय लाळ्या खुरकूत आजाराने मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामुळे या गरीब गोपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सातपुते यांनी  मृत गाईंचे शवविच्छेदन करुन मृत गाईंचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहे.    तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. माने यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली प्रवरा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भवर, आंबी-अंमळनेर येथील डॉ. दत्तात्रय साळुंके, डॉ. अजित सालबंदे लसीकरण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे.

“लाळ्या खुरकूतच्या साथीने पशुपालक चिंतेत आहे. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी युद्धपातळीवर लसीकरण सुरू केले आहे. पशुपालकांनी चिंता न करता पशुधनाची काळजी घ्यावी. याकामी आंबी-अंमळनेर ग्रामपंचायत पशुवैद्यकीय विभागाला सर्वतोपरी सहकार्य करीत आहे.”– विजय डुकरे (उपसरपंच आंबी)

COMMENTS