रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखणार

रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच काळ्याबाजारात इंजेक्शनची विक्री होत असल्याचे अनेक प्रकार राज्यात उघडकीस आले.

सरपंचाचा शेतकर्‍यावर तलवारीने हल्ला
ओबीसी आरक्षणासाठी क्रिमीलेअरची मर्यादा वाढणार ?
माण तालुक्यातील 13 हजार मुलांचे लसीकरण होणार

जालना/प्रतिनिधीः रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच काळ्याबाजारात इंजेक्शनची विक्री होत असल्याचे अनेक प्रकार राज्यात उघडकीस आले. त्यानंतर राज्य सरकारने रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी दोन पद्धतीनी रेमडेसिवीर वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

टोपे यांच्या हस्ते जालन्यात खासगी कोविड रुग्णालयांना दहा हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप करण्यात आले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, की रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन करणार्‍या सात कंपन्यांकडून निविदा पद्धतीने हाफकीन कंपनी सरकारच्या वतीने टेंडर काढून हे इंजेक्शन खरेदी करेल आणि शासकीय रुग्णालयांना पुरवठा करेल. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात एक स्टॉकिस्ट असणार असून, त्याला या इंजेक्शनचा पुरवठा केला जाणार आहे. जिल्हाधिकारी खासगी रुग्णालयांची इंजेक्शनची गरज लक्षात घेऊन इंजेक्शनचा पुरवठा करतील. या वाटपावर जिल्हाधिकार्‍यांचे नियंत्रण असल्याने काळाबाजार होणार नाही. यातून खासगी रुग्णालयांना सहज रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होईल. रेमडेसिवीर इंजेक्शनचा टास्क फोर्सने सांगितल्याप्रमाणे योग्य पद्धतीने वापर केल्यास तुटवडा भासणार नाही, असे टोपे यांनी या वेळी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राने ऑक्सिजन पुरवठा करावा अशी मागणी केली आहे; मात्र कोणतेही राज्य यासंदर्भात मदत करायला तयार नसून, आपल्याकडे उपलब्ध असलेला ऑक्सिजनची गळती थांबवून त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करावा लागेल हाच मार्ग आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ब्रेक द चेन संदर्भातील आवाहनाला सर्वांनी घरी राहून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

हवेतील ऑक्सिजन शोषणारा प्रकल्प

सध्या ऑक्सिजनची कमतरता असून जालन्यातील घनसावंगी येथे येत्या 15 दिवसांत हवेतील पूर्ण ऑक्सिजन शोषून घेणारा प्रकल्प उभारत असून यात यश मिळाले तर संपूर्ण राज्यात असे प्रकल्प  उभे करता येतील आणि द्रवरुप ऑक्सिजनला पर्याय मिळेल, अशी माहिती टोपे यांनी दिली

COMMENTS