Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवले पूल परिसरात वाहनांच्या वेगाला लगाम

पुणे/प्रतिनिधी ः मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पूल ते कात्रज बोगदा दरम्यान होणारे गंभीर अपघात रोखण्यासाठी जड आणि अवजड वाहनांसाठी ताशी वेगम

भाग बाजार निवडणूक निकालांचा निर्देशक !
दिवाळी निमित्त वृद्धाश्रमात आरोग्य तपासणीद्वारे मोफत औषधांचे वाटप
मंत्री गडाखांनी राजीनामा देण्याची मुरकुटेंची मागणी

पुणे/प्रतिनिधी ः मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पूल ते कात्रज बोगदा दरम्यान होणारे गंभीर अपघात रोखण्यासाठी जड आणि अवजड वाहनांसाठी ताशी वेगमर्यादा प्रतितास 60 किलो मीटरवरून 40 किलोमीटर करण्यात आली आहे. बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल परिसरात घडलेले प्राणांतिक आणि गंभीर अपघात जड आणि अवजड वाहनांमुळे झाले आहेत.
अवजड वाहनचालकांचा ताबा सुटल्याने अपघात होत असल्याचे दिसून आले आहे. वाहतूक शाखा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या समितीतर्फे कात्रज बोगदा ते नवले पूल परिसराची पाहणी करून अहवाल सादर करण्यात आला आहे. अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या असून जड आणि अवजड वाहनांवर वेगमर्यादा घालण्यात आली आहे. नागरिकांनी त्यांच्या सूचना किंवा तक्रारी 26 मे पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

पुणेकर अडकले वाहतूक कोंडीत – भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्य समिती बैठकीचा फटका जंगली महाराज रस्ता आणि परिसराला बसला. जंगली महाराज रस्त्याच्या दुतर्फा आणि आसपासच्या गल्ल्यांमध्ये मिळेल तिथे मोटारी, दुचाकी लावण्यात आल्याने वाहतूक कोंडी झाली. या बैठकीसाठी भाजपकडून मोठ्या प्रमाणावर स्वागतासाठीचे फलक लावण्यात आले आहेत. त्यावरूनही नाराजी व्यक्त होत असतानाच वाहतूक कोंडींचा फटका वाहनचालकांना सहन करावा लागला. सकाळची वेळ असल्याने कामासाठी कार्यालयात पोहोचण्यासाठी निघालेले नोकरदार वाहतूक कोंडीत अडकून पडले. जंगली महाराज रस्त्या बरोबरच ओंकारेश्‍वर परिसरातही बेशिस्तपणे वाहने उभी करण्यात आली आहेत.

COMMENTS